राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन त्या काळात उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मनमिळावूपणामुळे त्यांच्या घरी नेहमीच पाहुण्यांचे येणे-जाणे चालू असायचे. त्या काळात देशात गहू आणि तांदळाचा तुटवडा होता. सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत (रेशन दुकानदारांमार्फत) गहू-तांदळाचा पुरवठा सुरू केला होता, जेणेकरून सर्वसामान्यांना परवडणार्या दरात अन्नधान्य मिळू शकेल.
टंडनजींच्या घरात गहू-तांदूळ आठवडाभरातच संपून जात असे. मग ज्वारी किंवा जवसारख्या धान्यांच्या भाकर्या बनवल्या जात.
एक दिवस टंडनजींना संदेश मिळाला की काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते बिहारहून लखनऊला येणार आहेत. ते त्यांच्या घरी जेवण करून लगेच दिल्लीकडे विमानाने रवाना होतील. जेवणाची तयारी करण्यासाठी टंडनजींनी स्वयंपाक्याला सूचित केले. तेव्हा स्वयंपायाने सांगितले की गहू, डाळ, तांदूळ आधीच संपले आहेत. पण तो म्हणाला, मी काळ्या बाजारातून (ब्लॅकमध्ये) गहू आणि तांदूळ आणतो, म्हणजे पाहुण्यांची नीट खातीरदारी होईल.
टंडनजींनी याला कडक विरोध केला. त्यांनी स्पष्ट सांगितले, मी काळ्या बाजारातून धान्य आणून पक्षाच्या निधीचा गैरवापर करणार नाही. जे काही घरात उपलब्ध आहे त्यातूनच जेवण तयार करा.
त्यानंतर त्यांनी स्वयंपायाला सांगितले, बागेतून बटाटे आणा, उकडून त्यांच्या साले काढा आणि थाळीत मांडून ठेवा. त्याबरोबर मीठ आणि मिरी द्या. स्वयंपाक्याला हे विचित्र वाटले, पण टंडनजींसमोर तो काही बोलू शकला नाही.
पाहुणे आले, गप्पा झाल्यानंतर टंडनजी त्यांना जेवणाच्या टेबलाजवळ घेऊन गेले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, आज आमच्याकडे आटा, डाळ व तांदूळ संपले आहेत. मी ब्लॅकमध्ये अन्नधान्य विकत घेणे योग्य समजत नाही. त्यामुळे आज तुम्हाला जेवणात हेच खावे लागेल.
सर्व पाहुण्यांनी प्रेमाने आणि आदराने ते जेवण स्वीकारले. त्यांनी टंडनजींच्या तत्त्वनिष्ठतेचे आणि त्यांच्या नैतिकतेचे कौतुक केले.
आजच्या काळातील राजकारण्यांची उधळपट्टी पाहताना टंडनजींसारख्या तत्वनिष्ठांची उणीव पदोपदी भासते हे खरे नाही काय?
Check Also
ऊर्जादायी यशोगाथा
विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात …