लेख-समिक्षण

माणूस निर्णय कसा घेतो?

माणसाची बुद्धी ही निश्चयात्मिका असते. याचा अर्थ ती निश्चित काय ते ठरवू शकते. ‘छापा की काटा’ या प्रश्नावर आपण काय उत्तर देतो हे मेंदूतील याद़ृच्छिक चढउतारांवर म्हणजेच उद्दिपनांवर अवलंबून असते. जेव्हा दोन सारखेच आकर्षक पर्याय आपल्यापुढे असतात, तेव्हाही याचाच वापर केला जातो, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. माणसाशिवाय अन्यही प्राण्यांमध्ये अशी निर्णयक्षमता असू शकते.
न्यूरोइकॉनॉमिक्स या विषयातील या संशोधनात अर्थशास्त्रज्ञांची आंतरद़ृष्टी व मेंदूचा वैज्ञानिक अभ्यास यांची सांगड घालून मेंदूत निर्णयाची प्रक्रिया कशी होते हे जाणून घेतले जाते. हे निर्णय घेण्यात एक वाकडेतिकडेपणा असतो ते सहजगत्या कधीच घेतले जात नाहीत. न्यूरोइकॉनॉमिक्सचा उपयोग केवळ चांगले आर्थिक सिद्धांत तयार करण्यासाठीच केला जातो, असे नाही, तर त्यातून वैद्यकीयद़ृष्ट्या उपयुक्त माहितीही मिळू शकते, असे सेंट लुईस येथील वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या कॅमिलो पॅडोआ-शिओपा यांनी म्हटले आहे. निर्णय प्रक्रियेत मेंदूच्या पेशींची भूमिका नेमकी काय असते याबाबत अभ्यास करताना पॅडोआ-शिओपा यांनी वानरांना द्राक्षाचा रस व सफरचंदाचा रस असे दोन पर्याय दिले त्यात पेयाचे प्रमाण व प्रकार यात बदल केलेला होता. या वानरांनी यातील पेय निवडताना घेतलेल्या निर्णयाच्या वेळी मेंदूतील न्यूरॉन्सची नेमकी कृती काय घडते हे संशोधकांनी तपासून पाहिले. त्यात त्यांना असे दिसून आले, की मेंदूच्या ऑरबिटोफ्रंटल कॉर्टेक्स या भागातील पेशींमध्ये वेगवेगळ्या पातळीवर निर्णयाची ही प्रक्रिया होते. जेव्हा विविध समूहातील पेशींची निवडलेल्या पर्यायाच्या मूल्याच्या द़ृष्टिकोनातून तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याचा संबंधही ऑरबिटोफ्रंटल कॉर्टेक्समधील न्यूरॉन्स समूहाशी दिसून आला. या न्यूरॉन्स समूहाच्या उद्दिपनातील बदल हे या वानरांना प्रत्यक्ष पेयांचे पर्याय देण्यापूर्वीच झाल्याचे दिसून आले, असे पॅडोआ शिओपा यांचे मत आहे. ‘न्यूरॉन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे.

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *