लेख-समिक्षण

आदर्श महान उद्योजकाचा

भारतरत्न जेआरडी टाटा यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं असतं. त्यांनी एअर इंडियासाठी घेतलेले परिश्रमच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होते. 1932 मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले. टाटांनी एअर इंडियात विमानांकडे केवळ एक मशीन म्हणून पाहिले नव्हते. तर, त्यांना आपल्या घरातील सदस्यांप्रमाणेच सजवले होते. घरातील वस्तूंचे रंग, त्यांची भव्यता जशी असते. तशीच ते विमानात सजावट करायचे.विमानातील स्वच्छतेकडे जातीने लक्ष द्यायचे. तसेच, ते वेळ मिळेल तेव्हा स्वत: विमान स्वच्छ करायचे. अशाच एका व्हिजिटवेळी त्यांन संडासंचं भांड अस्वच्छ दिसलं. तर, कोणताही विचार न करता त्यांनी हाताच्या बाह्यांनी ते पुसून घेतलं. तर, एका प्रसंगी टेबलवर साचलेली धूळ पुसण्यासाठी त्यांनी सेवकाकडून डस्टर मागवलं आणि स्वत:च टेबल साफ केला. जेआरडींसाठी ही काही नवं नव्हतं. त्यांनी जे काही काम केलं ते आपलं म्हणूनच केलं म्हणूनच एअर इंडियासोबतच इतरही समुह मोठे झाले.
टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. फ्रान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. 1925 मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अ‍ॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 1938मध्ये वयाच्या 34व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला आणि देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिले.
कोणतेही काम कमी दर्जाचे नसते ही बाब ‘जेआरडीं’ यांच्या संडास स्वच्छ करण्याच्या वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *