लेख-समिक्षण

येणार ‘बाजीगर’चा सिक्वल

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ’किंग’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. परंतु सध्या त्याच्या 1993 साली प्रदर्शित झालेल्या ’बाजीगर’ चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हा चित्रपट रिलीज झाल्याच्या 31 वर्षांनंतर निर्माते या चित्रपटाचा रिमेक आणणार आहेत. ‘बाजीगर’ चित्रपटाच्या दुसर्‍या भागाची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी ‘बाजीगर’ चित्रपटाच्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. रतन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीगर चित्रपटाच्या सीक्वेलबाबत सध्या शाहरुख खानसोबत सुरुवातीच्या टप्प्यातील चर्चा सुरु आहे. अद्याप या चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार झालेली नाही. परंतु, जर शाहरुख खान पुन्हा एकदा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असेल तर निर्माते या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करतील. यासाठी उत्कृष्ट स्क्रिप्टसोबतच एका नव्या दिग्दर्शनाची गरज आहे. बाजीगर या पहिल्या चित्रपटाला जे प्रेक्षकांचे प्रेम आणि यश मिळाले, ते चित्रपटाच्या दुसर्‍या भागात सार्थ ठरले पाहिजे.
दरम्यान, शाहरुख खानचा ‘बाजीगर’ चित्रपट 12 नोव्हेंबर 1993 मधये प्रदर्शित झाला होता. सध्या या चित्रपटाला 31 वर्षेपूर्ण झाली आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटात काजोलने देखील काम केले होते. या चित्रपटातील काजोल आणि शाहरुखच्या जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. यात शिल्पा शेट्टी, राखी, सिद्धार्थ रे, जॉनी लीवर देखील या चित्रपटात होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले होते.
शाहरुख खान लवकरच त्याची मुलगी सुहाना खानसोबत ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. बाप-लेकीची ही जोडी चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.- राकेश माने

Check Also

छप्परफाड कमाई

‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *