लेख-समिक्षण

ब्लू टूथ फाईव्हः अधिक स्पीड आणि रेंज

मोबाईल हे केवळ आता संवादाचे माध्यम राहिले नसून मल्टिपर्पज म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. नेट सर्फिंग, व्हिडिओ, फाइल डाऊलोडिंग, नेव्हीगेशन यासारख्या अनेक सुविधा मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे उपयोगी अ‍ॅप असतात की ज्या माध्यमातून आपण दैनंदिन कामे सहज करू शकतो. याच माध्यमांचा उपयोग करून फाईलची देवाणघेवाणही सहज शक्य झाले आहे. ब्लू टूथ ही सर्वात जूनी संकल्पना असून त्यात काळानुरुप बदल केले जात आहे. आजघडीला झेंडर, शेअर इट सारखे शेअरिंग अ‍ॅप असले तरी ब्लू टूथचे महत्त्व अजूनही टिकून आहे. नव्या ब्लू टूथ फाईव्हमुळे देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत वेग आल्याचा दावा केला जात आहे. ब्लू टूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप (एसआयजी)ने नुकतीच नवीन ब्लू टूथ फाईव्ह स्पेकची घोषणा केली आहे. सध्याच्या ब्लू टूथ 4.2 मध्ये सुधारणा करत ब्लूटूथ फाईव्हची निर्मिती करण्यात आली आहे. नव्या ब्लूटूथमध्ये डिव्हाइस कंम्पाबिलिटी वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्य डिव्हाइसला सहजपणे कसे कनेक्ट होईल, याचाही विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नवा ब्लू टूथ फाईव्हची रेंज किंवा कक्षा ही ब्लू टूथ 4.2 पेक्षा चौपट आधिक आहे. डेटाच्या देवाणघेवाणीचाही वेग आठपट अधिक आहे.

Check Also

सौंदर्यप्रसाधने वापरताय?

आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *