अभिनेता आमिर खान दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.अनुराग बसू आणि भूषण कुमार किशोर कुमार यांच्या आयुष्यावर एक बायोपिक बनवत आहेत. यासाठी आमिर खानला ऑफर देण्यात आली आहे.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानला किशोर कुमार खूप आवडतात आणि त्यांच्या वरील प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. त्यातच दिग्दर्शक अनुराग बसूची एक हटके स्टाईल आहे जी त्याला खूप आवडते. त्यामुळेच तो या प्रोजेक्टमध्ये उत्साहाने सहभागी झाला असल्याची चर्चा आहे. मात्र आमिर या सिनेमात काम करणार की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही शिवाय या सिनेमाची कोणतीही अपडेट अजून समोर आली नाही. आमिर खान या वर्षाच्या अखेरीस किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आमिर खानने नुकतेच त्याच्या ‘सीतारे जमीन पर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात अमीर बरोबर जेनेलिया देशमुख काम करणार आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान सध्या 5 चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या यादीमध्ये उज्ज्वल निकमचा बायोपिक, राजकुमार संतोषी यांचा कॉमेडी ‘चार दिन की जिंदगी’, लोकेश कनगराजचा सुपरहिरो चित्रपट, झोया अख्तरचा चित्रपट आणि ‘गजनी 2’ यांचा समावेश आहे- जान्हवी शिरोडकर
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …