लेख-समिक्षण

जपानमधील प्रकाशाचे गूढ

नुकतेच जपानमध्ये किनारपट्टीला लागून असणार्‍या एका शहरातून आभाळाकडे पाहिले असता रहस्यमयरीत्या चमकणारे 9 खांब दिसले. आभाळात दिसणारे हे दृश्य पाहून स्थानिक लोक हैराण झाले. नेमकं घडतंय काय, हेच त्यांना कळत नव्हतं. सध्या सोशल मीडियावर जपानमधील हेच फोटो व्हायरल होत असून, माशी नावाच्या एका स्थानिक व्यक्तीनं घडल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. अर्थात, नंतर या प्रकाशाचे गूढही उकलले !
घरातून बाहेर पडताच त्याने आभाळाकडे पाहिलं असता, अचानक आकाशात प्रकाशमान गोष्टी दिसल्या. साधारण खांबाच्या आकाराप्रमाणं दिसणारा हा प्रकाश ठरावीक अंतरानं दिसत होता. माशीने कसंबसं हे दृश्य कॅमेरात कैद करत ते सोशल मीडियावर शेअरही केलं. आता मुख्य प्रश्न होता तो म्हणजे हे नेमकं होतं काय? हा एलियन्सचा इशारा होता? हे परग्रहावरून येणारे संकेत होते, की आणखी काही, अशा एक ना अनेक प्रश्नांनी माशीच्याही मनात घर केलं होतं. 11 मे रोजी जपानच्या टोटोरी प्रांतावरील आभाळात हे प्रकाशमान खांब पाहायला मिळाले. स्थानिकांसाठी हा प्रकार अनपेक्षित होता. पण, एलियन आणि एलियनभोवती फिरणार्‍या शंका मात्र या वातावरणात सातत्यानं टिकून होत्या. प्रत्यक्षात मात्र हा प्रकार अपेक्षेपलीकडचाच होता. हा उजेड किंवा हे प्रकाशमान खांब कोणा एलियनचा इशारा किंवा कोणता परग्रहावरील उजेड नसून, हा उजेड होता जहाजांचा.
जपानच्या या शहरातून समोरच्या बाजूस असणार्‍या एका भागातून मासेमारी करणार्‍या जहाजांचं प्रतिबिंब ढगांमध्ये परावर्तित होऊन हा उजेड निर्माण झाला होता. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते या उजेडाला ‘इसरिबी कोचू’ म्हणून संबोधतात. अशा घटना वारंवार घडत नसल्यामुळं अनपेक्षितरीत्या असं काही घडलं की, जी प्रतिक्रिया दिली जाते, अगदी तसाच काहीसा प्रकार, या एका फोटोमुळं घडल्याचं पाहायला मिळालं.

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *