लेख-समिक्षण

बॉबीचा ‘दक्षिण धमाका’

अभिनेता बॉबी देओल ’अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील मिळाला. यानंतर तो दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसणार आहे. सध्या बॉबी देओल एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसत आहे. याचदरम्यान आता तो ‘थलपथी 69’मध्ये दमदार अवतारात दिसणार आहे.
बॉबी देओलला साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट ‘थलपथी 69’ मध्ये कास्ट करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसनेही माहिती दिली आहे. ‘थलपथी 69’ च्या प्रोडक्शन हाऊसने ट्विटर अकाउंटवर बॉबी देओलच्या फोटोसह पोस्टर शेअर केले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आता 100 टक्के अधिकृत, मी हे घोषित करताना खूप आनंदी आणि उत्साहित आहे. बॉबी देओल थलपथी 69 च्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे.’ बॉबी देओलनेही इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ‘या प्रोजेक्टचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ दरम्यान, एच. विनोद दिग्दर्शित ‘थलपथी 69’ तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. देशभरातील चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रशांत, प्रभू देवा, मोहन, जयराम, स्नेहा, लैला, अजमल अमीर आणि मीनाक्षी चौधरी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. थलपथी विजय आणि बॉबी या दिग्गज कलाकरांनाही यात एकत्र पाहता येणार आहे. याआधी बॉबी देओल ‘कांगुवा’ चित्रपटात दिसणार आहे. सूर्या स्टारर चित्रपटात बॉबी देओलचा खलनायक अवतार दिसणार आहे. या चित्रपटात दिशा पटानी देखील दिसणार आहे. 14 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. – मानसी जोशी

Check Also

चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप

चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्‍या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *