जगभरात अनेक भव्य मॉल पाहायला मिळतात. एकाच छताखाली अनेक वस्तू, किराणा आणि भाजीपालाही खरेदी करण्याची सोय अशा मॉलमुळे होत असते; मात्र जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? असा मॉल इराणमध्ये असून त्याचे नावच ‘इराण मॉल’ असे आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हा मॉल आहे. या मॉलची इमारत सात मजली आहे. 3 लाख 17 हजार चौरस मीटरच्या जागेत ही इमारत पसरलेली आहे. मॉलचे पहिल्या टप्प्यातील संपूर्ण इन्फ्रास्ट्राक्चर 13 लाख 50 हजार चौरस मीटरचे आहे. 16 लाख चौरस मीटरचे होणार आहे. ही इमारत बनवण्यासाठी 25 हजार मजूर आणि 1200 काँट्रॅक्टर्सनी योगदन दिले आहे.
या मॉलमध्ये एकूण 708 दुकाने आहेत. या मॉलमध्ये पारंपरिक बाजारही असून तो तबरीज, इस्फाहान, शिराजमधील बाजारांच्या धर्तीवर आहे. मॉलमध्ये भव्य अशी दीदार गार्डनन असून तिचे छत 14 मीटर लांबीचे आणि काचेचे आहे. या बागेत पाम वृक्ष आणि अनेक कारंजे आहेत. ही बाग 3 हजार चौरस मीटरची आहे. मॉलमध्ये महान गार्डन नावाची आणखी एक बाग असून तिची रूंदी 50 मीटर आणि लांबी 170 मीटर आहे. मॉलमध्ये अतिशय सुंदर असा ‘मिरर हॉल’असून तो काजेच्या कलाकृतींनी मढवलेला आहे. मॉलमध्ये एक ग्रंथालयही आहे.
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …