लेख-समिक्षण

अभ्यास करताना झोप का येते?

कोणी अभ्यास करताना किंवा पुस्तक वाचताना मध्येच झोपलं तर आपण काय म्हणतो, अरे हा तर किंवा ही तर किती आळशी आहे! असं लेबल लावून आपण मोकळं होतो. परंतु, जरा विचार केलाय का की, त्या व्यक्तीला नक्की अभ्यास करताना झोप का लागत असेल? हा विचार तुम्ही नक्कीच केला नसेल कारण आपण अशावेळी एवढा गंभीर विचार करत नाही. परंतु, तुम्हाला यामागचे कारण जाणून घेऊन नक्की आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया की अभ्यास करताना झोप लागण्यामागचे नक्की कारण आहे तरी काय?
यामागे एक रंजक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण अभ्यास करायला सुरूवात करतो तेव्हा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करतो. डोळ्यांचा वापर या प्रक्रियेत सर्वाधिक होत असल्याने जेव्हा आपण जास्त वेळ अभ्यास करून थकतो तेव्हा आपल्या मेेंंदूला आपोआप संकेत जातात.
जेव्हा जास्त वेळ अभ्यास करून आपले डोळे थकल्यानंतर त्यांच्यावर जास्त ताण पडतो आणि आपल्या डोळ्यातील स्त्रायू शिथिल होऊ लागतात. तेव्हा आपला मेंदूच यापुढे अजून वाचन तुमच्याकडून होऊ शकणार नाही याचे संकेत देतो. आपल्यापैकी अनेक जणांना झोपेचा त्रास होत असेल तर काही जणांना जास्त वेळ झोप लागत असेल अथवा काही जणांना कमी झोप लागत असेल तर अशा लोकांना अभ्यास करताना झोप लागण्याची शक्यता सर्वाधिक असते. कामावर जाणार्‍या लोकांचेही असे होऊ शकते; पण या प्रमाण कमी असते, परंंतु अभ्यास करायला बसलेल्या विद्यार्थ्यांना झोप लागण्याची शक्यता जास्त असते.
अभ्यास किंवा वाचन करीत असताना आपले शरीर हे रिलॅक्स असते आणि फक्त डोळे आणि मेंदूच यावेळी काम करत असतो तेव्हा या क्रियेला प्रोत्साहन मिळू नये म्हणून कधी लोळत पडून अभ्यास करू नये. फक्त अभ्यास करतानाच नाही तर ही समस्या गाडी चालवणार्‍या ड्रायव्हर्समध्येही दिसून येते यामागेही शास्त्रीय कारण आहे.

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *