बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्या ठरल्या. परंतु, बोइंगचे स्टारलायनर अवकाश स्थानकावर उतरले तेव्हापासूनच सुनीता विल्यम्स यांच्या माघारी दौर्याच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यात अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. यानाची दिशा निश्चित करणारे पाच थ्रस्टर्स बंद पडले. कालांतराने हीलियम गॅसही संपला. अशा स्थितीत आता सुनीता पृथ्वीवर परतण्याविषयी काळजीचे ढग जमा झाले आहेत.
जगभरातील भारतीय पुन्हा एकदा भारतीय वंशांची अंतराळवीर सुनीता विल्यिम्सची काळजी करत आहेत. वास्तविक जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अभ्यासासाठी गेलेल्या सुनीता विल्यिम्स यांना सहकार्यांसह पृथ्वीवर परतण्यात अडचणी येत आहेत. त्या बोइंगचे अवकाशयान स्टारलाइनरमधून गेल्या असून त्यात आता अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासा आपल्या अंतराळवीरांबाबत कोणतिही जोखीम उचलण्यास तयार नाही. अर्थात ते दोघे खूप अनुभवी आणि प्रशिक्षित अंतराळवीर असून त्यांच्या जीव कोणत्याही स्थितीत धोक्यात जावू नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेत काही गडबड झाली तर सुपरपॉवरच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसणार आणि त्याची किंमत बरीच मोजावी लागेल. दुसरीकडे चीनकडून अवकाश कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले जात असताना आणि त्यांच्याकडून अमेरिकेला शह मिळत असताना सुनीता विल्यम्स यांची मोहीम सुरक्षितपणे पार पडणे महत्त्वाचे ठरत आहे. भारतीयांना मात्र आपल्या कन्येची काळजी आहे. कारण अंतराळवीर कल्पना चावला यांना गमावल्याचे दु:ख तमाम भारतीयांच्या मनात अजूनही आहे. हरियानाच्या या लाडल्या कन्येला अवकाश मोहिमेदरम्यान जीव गमावावा लागला आणि ते दु:ख विसरलेले नाही.
अमेरिकेतील बातम्या पाहता सुनीता विल्यम्स यांना आठ दिवसांच्या मोहिमेसाठी पाठविण्यात आले होते, पण आता त्यांना आठ महिने तेथे मुक्काम करावा लागणार आहे. अर्थात अशा प्रकारे अवकाशात अनिश्चिततेच्या वातावरणात अडकणे हे नक्कीच जीवाला घोर लावणारे आहे. मात्र सुनीता या धाडसी अंतराळवीर आहेत. आपण नक्क्कीच पृथ्वीवर परत येऊ, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी नासाच्या मोहिमेवर विश्वास व्यक्त केला आहे. लढाऊ हेलिकॉप्टरचे सारथ्य करणार्या सुनीता यांनी अवकाश स्थानकापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. ही त्यांची तिसरी अवकाश मोहीम आहे.
बोइंग स्टारलायनर यानातून झेप घेणार्या सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवताच सहकार्यांची अतिशय उत्साहाने घेतलेली भेट सर्व जगाने पाहिली. त्यांची ऊर्जा आणि आशा आकांक्षा अनेकांच्या जिद्दीला बळ देणार्या ठरल्या. अंतराळवीर कोणताही असो त्याला कठीण प्रशिक्षणातून आणि प्रबळ मानसिकतेतून तयार केले जाते आणि मोहिमेत सामील करून घेतले जाते. अर्थात जोखीम तर रस्त्यावरून चालणार्या माणसाला देखील असते. मात्र अंतराळवीरच्या आयुष्यात तर जोखीम ही प्रत्येक क्षणी असते.
बोइंगचे स्टारलायनर अवकाश स्थानकावर उतरले तेव्हापासूनच सुनीता विल्यम्स यांच्या माघारी दौर्याच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली. त्यात अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. यानाची दिशा निश्चित करणारे पाच थ्रस्टर्स बंद पडले. कालांतराने हीलियम गॅसही संपला. म्हणून त्याला आता पर्यायी इंधनावर राहवे लागेल. ‘नासा’ने आपल्या अंतराळवीरांना अवकाशात नेणाण्यासाठी व्यावसायिक उड्डाणांसाठी बोइंग आणि स्पेस एक्सशी अब्जावधी रुपयांचा करार केला आहे. आतापर्यंत नऊ मानवी अवकाश मोहिमा पार पाडणार्या स्पेस एक्सवर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोरला परत आणण्याची जबाबदारी सोपविली. ‘नासा’ने अवकाश मोहिमांतील संभाव्य अडथळे आणि संकटांचे आकलन करत निर्णय घेतलेला होता. तूर्त सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत अवकाश स्थानकात राहावे लागणार असून तसा निर्णय ‘नासा’ने घेतला आहे. याप्रमाणे ते स्पेस एक्स क्रु अवकाशयानातून पृथ्वीवर परततील. यात दोन अंतराळवीर जातील आणि परतीच्या प्रवासात सुनीता आणि विल्मोर असतील. या स्थितीला स्वीकारणारी 58 वर्षीय सुनीता विल्यम्सची जिद्द वाखण्याजोगी आहे.
पुढील सहा महिन्यांपर्यंतचा त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. यादरम्यान त्या अवकाश स्थानकावर शास्त्रीय कार्य करतील आणि यानाची डागडुजी तसेच स्पेस वॉक देखील करणार आहेत. यादरम्यान, बोइंगच्या दर्जावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. उड्डाणानंतर प्राथमिक स्थितीत असतानाच यानातून हीलियमची गळती होत असल्याचे संकेत मिळाले. मागच्या वेळी देखील बोइंगच्या अनेक अवकाश मोहिमा समाधानकारक राहिलेल्या नाहीत. दुसरीकडे बोइंगची स्पर्धक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळवले आहे. चार वर्षांपूर्वीच चिनी अवकाश यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत धडक मारली. तसेच अंतराळवीरांना आणि सामानाची ने आण करण्याचे कामही यशस्वीपणे केले आहे अणि करत आहे.सुनीता विल्यम्स या दोन महिन्यांपासून पृथ्वीपासून दूर अवकाशात राहत आहेत. एक प्रायोगिक अभियानाप्रमाणे त्या अवकाश केंद्रात गेल्या. मात्र आता त्यांना सहा महिने तेथेच काढावे लागणार आहे. सुनीता या नाताळ आणि नव्या वर्षाचे स्वागत अवकाशातच करणार आहेत. विशेष म्हणजे सुनीता विल्यम्सची अवकाश स्थानकाची तिसरी वारी आहे. त्या अनुभवी अंतराळवीर आहेत. अलिकडेच त्यांनी म्हटले, अवकाश स्थानकातील जबाबदारी पार पाडण्यात मी व्यग्र आहे. अवकाश स्थानकात गुरुत्वाकर्षण मुक्त वातावरणात तरंगणे चांगले अनुभवत आहे, असेही त्या म्हणाल्या. एकप्रकारे त्या अवकाशातील घरात वापसी झाल्याचे मानत आहेत. टीमबरोबर अभ्यास आणि संशोधनाचे काम करण्याचा अनुभव सुखद असल्याचे त्या म्हणतात. खरे तर अंतराळवीरांना आपल्या प्रवासात अचानक निर्माण होणार्या प्रत्येक आव्हानांचा आणि बिकट स्थितीचा मुकाबला करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक रुपाने सज्ज राहवे लागते. परंतु भार नसणे, झोपमोड, डोळ्यांवर पडणारा अतिरिक्त दबाव, समाजापासून दूर राहत एकांतपणा आणि भावनाशून्य स्थिती या गोष्टी संवेदनशील व्यक्तीचे खच्चीकरण करण्याचे काम करते. त्याचवेळी स्नायूचे वजन कमी झाल्याने अनेक प्रकारच्या अडचणी देखील येतात. सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी सुखरुप परततील, अशी आशा करु.
सध्याच्या स्थितीत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मनोमिलन होण्याची शक्यता धुसरच आहे. कारण यात शरद पवार राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे आणि राज्यातील आगामी निवडणुका पाहता ते अशा प्रकारची कोणतिही जोखीम उचलणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील अजित पवार यांच्यासमवेत ताळमेळ बसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकारणात अजित पवार एकाकी तर पडणार नाहीत ना? असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांना आपले राजकीय वर्चस्व कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेत बदल झालेला दिसून येत आहे. पक्षाचे अनेक नेते सोडून जाणे अणि शरद पवार यांच्यात सामील होत असल्याने अजित पवार दबावाखाली वावरत आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीतही त्यांचा वावर सहजपणे होताना दिसत नाही. कॅबिनेट मंत्रीपद हवे म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभाग घेतला नाही. यादरम्यान, संघ समर्थक एका मासिकेने भाजप हा अजित पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवेल, असा दावा केला आहे.-प्रा. विजया पंडित
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …