लेख-समिक्षण

हरभर्‍याची भाजी आरोग्यदायी

थंडीत उत्तरेकडील लोक जेवणात सरसो का साग, पालक का साग या भाज्या आवर्जून खातात. थंडीत तापमानात घट होत असताना त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. अशावेळी हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास हरभर्‍याच्या हिरव्या पाल्याची व चण्याच्या हिरव्या पाल्याच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात. मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हरभर्‍याच्या हिरव्या पाल्याची भाजी खूप फायदेशीर ठरते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाकरी खाल्ली तर आणखी चव वाढते. कारण बाजरी हे सुपरफूड आहे. त्यामुळं अनेक विकार दूर होतात. हरभर्‍याच्या पाल्याच्या भाजीत इन्सुलीनची निर्मिती वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळं मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी महिन्यातून दोनदा तरी सेवन करावी. हरभर्‍याच्या पाल्याच्या भाजीत अनेक प्रकारचे हेल्दी फॅट्स आणि पोटॅशियम असतं. ते हृदयाच्या संरक्षणासाठी आवश्यक घटक असतात. नितळ त्वचा मिळवण्यासाठी ही भाजी खूप जास्त फायदेशीर आहे. त्वचेवरील फ्री रॅडिकल कमी करण्यासाठी हरभर्‍याच्या पाल्याची भाजी मदत करते. त्यामुळं अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के हे घटक त्वचेचं सौंदर्य वाढवतात. थंडीत हवेतील प्रदूषण खूप वाढते. त्यामुळं थंडीत आवर्जून ही भाजी खावी. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि के घटक डोळ्यांच्या स्नायूंचे पोषण करतात. त्यामुळं डोळ्यांचे तेज वाढते.

Check Also

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *