गांभीर्याने काम करणे
कामात चालढकलपणा करणे हा अनेकांचा स्थायीभाव असतो. त्यातून फाजील आत्मविश्वास वाढू लागतो आणि परिणाम ते काम कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे वेळेवर काम करण्यावर अगोदर भर द्यायला हवा. वरिष्ठांनी किंवा कंपनीने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी सहज न घेता गांभीर्याने घ्यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
करियर करण्याची अफाट ऊर्मी असणार्या तरुणींनी आपली कारकिर्द यशस्वी करण्यासाठी अंगी व्यवसायिकता बाणवणे अत्यंत गरजेचे आहे. ऑफिसमध्ये वावरताना किंवा बैठकीमध्ये आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून व्यवसायिकपणा दिसणे गरजेचे आहे. कामाचे नियोजन, वेळेचे पालन, कामातील निटनेकपणा, भूमिकेबाबत स्पष्टता आणि शिस्त या गोष्टींच्या जोरावर यशाचे शिखर सहजपणे गाठू शकतो.
कार्यालयीन संस्कृती: कार्यालयीन शिस्त आणि नियमानुसार काम करणे हे एक व्यवसायिकपणाचे पहिले लक्षण आहे. अनावश्यक फोन टाळणे, महत्त्वाचे नसणार्या ईमेलला उत्तर देण्याचे टाळणे, चॅटिंग किंवा फोनवर अधिक काळ न घालवणे यासारख्या गोष्टींचे पालन केल्यास कार्यालयातील शिस्त कायम राहू शकते. बैठकीला वरिष्ठांच्या अगोदर हजर राहणे, कामावर वेळेवर असणे आणि वेळेवर घरी जाणे, गप्पागोष्टी टाळणे, गॉसिंपिंग न करणे यासारख्या बाबींबाबत सजग राहणे गरजेचे आहे.
नम्र आणि आनंददायी वृत्ती: सर्वांशी नम्रपणे आणि आनंददायी वृत्तीने संवाद साधून आदरभाव व्यक्त करणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर कसे देता येईल, याबाबत आपण काळजी घ्यायला हवी. एखाद्या कामाला विलंब झाला असेल तर त्याबाबत चर्चा करण्यापेक्षा ते काम लवकर तडीस कसे नेता येईल, याबाबत कृतीशील राहणे आवश्यक आहे.
विश्वास निर्माण करा: कंपनी किंवा वरिष्ठ मंडळी एखादी जबाबदारी सोपवताना संबंधित वयक्ती विश्वासार्ह आहे की नाही, याची तपासणी करत असतात. आपण केलेल्या कामातून, उचललेल्या जबाबदारीतून, निर्णयक्षमेतून, सामूहिक नेतृत्वातून विश्वास निर्माण होत असतो. हा विश्वास काही एका दिवसात निर्माण होत नाही. निरंतर चालणार्या कार्यप्रक्रियेतून विश्वास निर्माण होत असतो. आपण स्वीकारलेल्या जोखमीतून आपली कार्यक्षमता सिद्ध होत असते. त्यातूनच कंपनी आपल्यावर विश्वास टाकते. करियर जडणघडणीत विश्वासर्हता हा मोठा घटक आहे.
Check Also
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …