लेख-समिक्षण

चांगल्या हस्ताक्षरासाठी…

शाळा सोडल्यानंतर बर्‍याच जणांना सुंदर हस्ताक्षर आवडत असते, स्वतःचे हस्ताक्षर सुधारावे असेही वाटत असते. पण सुरुवात कशी आणि कुठून करावी हेच उमगत नसते. जर आपण लिहिलेले दुसर्‍याला वाचता येणार नसेल तर त्या लिखाणाचा फायदाच नाही. आपल्या अक्षरातून दुसर्‍याशी संवाद साधता आला पाहिजे. सुंदर हस्ताक्षरासाठी या काही टिप्स…
कसे सुधारावे हस्ताक्षर? : आपली नेमकी अपेक्षा काय आहे हे लक्षात घ्या, त्याप्रमाणे पावले टाका.काही अक्षरांबाबत आपल्याला आत्मविश्वास नसतो. ती अक्षरे आपल्याला सातत्याने आणि प्रयत्नाने सुधरावी लागतील. आपले हस्ताक्षर सुधारण्याची खूप कारणे आहेत. फक्त आपली तशी इच्छाशक्ती असली पाहिजे.
लिहिण्याची शैली तपासा : आपले लिखाण वाचणार्‍याला ते कसे दिसायला हवे ते ठरवा. अक्षरे गिरवायला बाजारात पुस्तके मिळतात. ती आणून त्यांचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्यातली शैली पाहण्यापेक्षा सावकाश लिहिणे महत्त्वाचे. बर्‍याचदा घाईघाईत लिहिल्यामुळे अक्षरात गिचमिड होते. या पुस्तकांचा अभ्यास करुन सावकाश लिहिण्याचा सराव करा.
पुन्हा शिका ः काही वेळा आपण लिहिताना उलट सुलट पद्धतीने अक्षर लिहितो. लिहिताना प्रत्येक अक्षर कसे, कुठल्या बाजुने लिहायचे हे ठरलेले असते. हस्ताक्षरात हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक शब्दातील अक्षर कसे लिहायचे याच्याकडे लक्ष द्या. आपण चुकीच्या पद्धतीने लिहीत असलेला शब्द पुन्हापुन्हा शिका. त्यासाठी इंटरनेट ची मदत घ्या. किंवा पुस्तके आणा.
सराव गरजेचाच ः चांगल्या हस्ताक्षरासाठी सराव गरजेचा आहे. संध्याकाळच्या वेळात टीव्ही पाहाताना किंवा रिकाम्या वेळेत आपण हा सराव करु शकतो. हस्ताक्षर सुधारणेसाठी सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. जितका सराव जास्त तितकेच आपले हस्ताक्षर सुंदर होण्यास मदत होईल.
इतरांचे निरीक्षण करा : लिहिणार्‍या इतर व्यक्तींचे निरीक्षण करा. निरीक्षणानेही आपण बरेच काही शिकू शकतो. त्यामुळे ज्यांचे हस्ताक्षर आपल्याला आवडते त्या व्यक्तीच्या लिखाणाकडे लक्ष द्या. त्यांच्या अक्षराची वळणे, रेघा यांचे निरिक्षण करा. त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळू शकेल.
बोटांचा नव्हे हातांचा वापर करा : काही लोकांना फक्त बोटांचा वापर करुन लिहिण्याची सवय असते. ही एक सवयही आपले हस्ताक्षर बिघडवू शकते. खरेतर लिहीताना पूर्ण हाताचा वापर झाला पाहिजे. लिहीताना फक्त बोटांचा वापर केल्यास त्यांच्यावर ताण येतो पर्यायाने अक्षर खराब येते. लिहीताना जास्त दाब देण्याची गरज नाही. त्यामुळे लिहीताना रेषाही वेड्यावाकड्या येऊ शकतात. उत्तम हस्ताक्षरासाठी सावकाश आणि हळुवारपणे लिहायला हवी.

Check Also

सौंदर्यप्रसाधने वापरताय?

आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *