ऑफिसला जाणार्या तरुणींंकडे असल्याच पाहिजेत अशा काही गोष्टी…
पांढरा शर्ट : ऑफिसला जाणार्या प्रत्येक तरुणींकडे पांढरा रंगाचा शर्ट असलाच पाहिजे. हा शर्ट आपण विविध तर्हेने घालू शकतो. पँटवर, स्कर्ट किंवा मोठ्या बॉटमच्या पँटवर हा शर्ट शोभून दिसतो. त्यामुळे ऑफिसमधील सहकार्यांकडून स्तुती होईल तसेच एखादा प्रकल्प मिळेल. एखाद्या चांगल्या लेदर बेल्टमध्ये हा शर्ट इन करा. फक्त हा शर्ट पांढराशुभ्र आणि कडक इस्त्री केलेला असला पाहिजे. या शर्टवर आपण स्कार्म किंवा ब्रोच सुद्धा वापरु शकतो.
स्कार्फ्स किंवा स्टोल : साधा, प्रिंटेड, पोल्का डॉटस, स्ट्राईप वेगवेगळ्या कापडाच्या प्रकारात स्टोल किंवा स्कार्फ्स आपण वापरू शकतो. लांबरुंद शाल ऑफिसला जाताना वापरणे श्रेयस्कर नसतेच त्यामुळे स्त्रिया स्कार्फ्स किंवा स्टोल वापरण्याला पसंती देतात.त्यात सुती, खादी, सिल्क, टसर, शिफॉन, लोकर, डेनिम पासून सिथेंटीक पर्यंत अनेक कापडाचे पर्याय उपलब्ध आहेत.
ब्लेझर : ब्लेझर स्त्रियांसुद्धा वापरु शकतात. ती फक्त काही पुरुषांची मक्तेदारी नाही. ऑफिसला जाताना काळा, निळा आणि बेज रंगाचे ब्लेझर आपण स्त्रिया सहजपणे वापरू शकतो. त्यामुळे ऑफिसमधल्या सहकार्यांवर आपली छाप पडते.
गडद रंगाचा वापर : जर आपण कंबरेपासून जाड असाल तर पारंपरिक रंगांचा वापर स्कर्ट किंवा पँट वापरा. आपल्यातील काही स्त्रियां एकदम छान बांध्याच्या असतील त्यांनी थोडे प्रयोगशील राहायला काहीच ह्रकत नाही. फीटींग पँटस, लाँग किंवा गुडघ्यापर्यंतचे स्कर्टस आपण घालू शकतो.
शूज : फ्लॅट प्रकारातील शूज रोजच्या वापरासाठी योग्यच आहेत. काळा रंगाचे शूज आपण रोज ऑफिसला आणि मिटिंगला जाताना सुद्धा घालू शकतो.
Check Also
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …