लेख-समिक्षण

३ हजारांमध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जगभर फिरत असतात. तेथून काही आयडिया घेऊन भारतात येतात आणि आपल्या मंत्रालयामार्फतत्या राबवित असतात. आता अशीच एक नवीन आयडिया आणली असून ती देशभरात १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून देशभर लागू होणार आहे.
केंद्र सरकार ३ हजार रुपयांचा फास्टॅग-आधारित वार्षिक पास सादर करत आहे, अशी माहिती त्यांनी बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली. येत्या १५ ऑगस्टपासून हा पास जारी केला जाणार असून, तो केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. गडकरी यांनी सांगितले की, हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेर्‍या पूर्ण होईपर्यंत वैध राहील. १५ ऑगस्ट २०२५ रोेजीपासून ३,००० रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० प्रवासांसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. हा पास विशेषत: गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यास सक्षम करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी/नूतनीकरण करण्यासाठी हायवे ट्रॅव्हल अ‍ॅप आणि वेबसाइटवर लवकरच एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त होईल. हे धोरण ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करेल आणि एकाच सोयीस्कर व्यवहाराद्वारे टोल पेमेंट अखंड करेल. फास्टॅग पासमुळे प्रतीक्षावेळ कमी होईल. प्रतीक्षावेळ कमी करून, गर्दी कमी करून आणि टोल प्लाझावरील वाद दूर करून, वार्षिक पास धोरण लाखो खाजगी वाहनचालकांना जलद, सुरळीत आणि चांगला प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
याआधी केद्रीय परिवहन विभागाने फास्टॅग-आधारित टोल वाहतूक सुरू केली. त्यामध्ये फास्टॅग अ‍ॅपमध्ये पैसे टाकले की, कार, ट्रक व इतर जड वाहनाने वाहतूक करता येत होती. मात्रत्याकरिता प्रत्येक प्रवासासाठी टोल टॅक्ससाठी फास्टॅग अ‍ॅपमध्ये पैसे टाकावे लागत असत. नवीन पासमध्ये वर्षभर २०० फे र्‍यांक रिता ३००० रुपये फास्टॅग अ‍ॅपमध्ये टाकावे लागतील. ज्यांच्या खाजगी चारचाकी वाहनाने (कार, जीप, व्हॅन इ.) टोल रस्त्यावर २०० फे र्‍या वाहतूक केली जात नाही, त्यांच्याकरिता हा फास्टॅग-आधारित वार्षिक पास निरूपयोगी ठरणारा आहे. नोकरी करणारे मध्यमवर्गीय आपल्या कार्यालयात जाताना दररोज टोल भरावा लागणार्‍या महामार्गाने प्रवास करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या टोल मार्गावर वर्षभरात २०० फेर्‍या पूर्ण होत नाहीत.

Check Also

१.३५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता

राज्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या गु्ंतवणूक प्रस्तावांना बुधवारी मुख्यमंत्री …