स्वप्नांबाबत प्राचीन काळापासूनच माणसाला कुतूहल वाटत आलेले आहे. आपल्याकडे उपनिषदांत ज्या तीन अवस्थांमधून आपण जातो, त्यामध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती (स्वप्नरहीत गाढ झोप) यांचा समावेश केलेला आहे. स्वप्नाबाबत आधुनिक काळातही अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. अनेकजण रात्री पाहिलेले स्वप्न विसरून जातात. परंतु, स्वप्न विसरण्यास आता बाय बाय करता येणार आहे. तुम्ही पाहिलेले स्वप्न रेकॉर्ड होणार आहे. मग सकाळी उठून स्वप्न काय पाहिले? त्याचा व्हिडीओ पाहता येणार आहे. जपानमधील शास्त्रज्ञांनी चक्क स्वप्न रेकॉर्ड करणारे मशिन बनवले आहे. त्यासाठी ‘एआय’चाही वापर केला आहे. या उपकरणाचे संशोधन क्रांतिकारी मानले जात आहे.
‘न्यूरल इमेजिंग’ तंत्रज्ञानाचा वापर
संशोधकांनी मेंदूच्या एक्टिव्हिटीज समजून घेण्यासाठी प्रगत ‘न्यूरल इमेजिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये स्वप्ने रेकॉर्ड करण्यासाठी मेंदूच्या सर्व क्रिया रेकॉर्ड केल्या जातात. विशेषत: झोपेच्या वेळी सर्वात जास्त रॅपिड आय मूव्हमेंट असते. एआय वापर करून मेंदूच्या लहरींचे नमुने ड्रीम सिक्वेन्समध्ये रूपांतरित केले जातात. त्यामुळे ते पुन्हा दाखवता येतात. या यंत्रामुळे संशोधकांना स्वप्नांच्या अभ्यासातील नवीन गोष्टी समजण्यास मदत होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, हे उपकरण केवळ वैयक्तिक अनुभव समजून घेण्यास मदत करणार नाही, तर मानसिक आरोग्य अन्? समस्यांचे विश्लेषण यामुळे होणार आहे. स्वप्न रेकॉर्डिंग यंत्राच्या मदतीने डॉक्टर रुग्णांची मानसिक स्थिती आणि भावनिक आव्हाने चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. परंतु, संशोधकांना रेकॉर्ड केलेल्या व्यक्तीची माहिती सुरक्षित राहील आणि तिचा वापर केवळ संशोधन किंवा वैद्यकीय हेतूंसाठी केले जाईल, हे निश्चित करावे लागणार आहे.
जपानमधील संशोधकांनी हे उपकरण तयार केल्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यक्तीच्या मनातील रहस्य समजू शकणार आहे. हे मशिन ब्रेन इमेजिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसने (एआय) मिळून केले आहे. मानवाच्या महत्त्वपूर्ण संशोधनात हे संशोधन समजले जाणार आहे.
Check Also
क्यूआर कोड प्रणालीच्या अंतरंगात
आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक …