अलीकडच्या काळात ‘हुडीज’ किंवा स्वेटशर्टची फॅशन आली आहे. परदेशात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने हुडीजचा सर्रास वापर होतो. आपल्याकडील वातावरण उष्ण आणि दमट असल्याने स्वेटर, स्वेटशर्टचा फारसा वापर होत नाही. काश्मीरमधील बहुतांशी नागरिक असा पेहराव करतात. परंतु युवकांमध्ये सध्या हुडीजची क्रेझ असून महाविद्यालय, प्रवास, पार्टीमध्ये अशा प्रकारचा पेहराव करताना दिसून येतात. विविध आकर्षक रंगाचे हुडीज किंवा स्वेट शर्ट घालून व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसते.
र्ी हुडीजचे प्रकार : हुडीज आपल्याला अनेक प्रकारात, डिझाईनमध्ये उपलब्ध होतात. ज्या युवकास समोरून झीप हवी असेल तर त्या प्रकारात हुडीज असताता किंवा ज्यांना डोक्यातून हुडीजचा पेहराव करायचा आहे, त्यांना दर्शनी भाग बंद असलेले हुडीज मिळू शकते. दोन्ही प्रकारचे हुडीज आकर्षक असतात यात वाद नाही. हुडीजचा मुलायम आणि उबदार कपडा आपल्या शरिरासाठी आल्हाददायक असतो.
र्ी कॉलेजजीवन : महाविद्यालयात जाताना कॉलेजकुमार फॅशनसाठी आतूर झालेले असतात. फॅशनची भूक भागविणारे स्वेटशर्ट किंवा हुडीज हे आजच्या युवकाच्या पसंतीस पडणारे सर्वाधिक ब्रँड मानले जाते. अनेक युवकांजवळ हुडीजची जोडी असते. जिन्स किंवा फॉर्मल पँटला सुटेबल असणारी हुडीजचा पेहराव करून कॉलेजला जावू शकतात.
र्ी स्ट्रिट लूक : सकाळी व्यायामाला जाताना हुडीज घालण्याची फॅशन रुढ झाली आहे. एवढेच नव्हे तर वयस्कर मंडळीही बागेत फिरायला जाताना स्वेटशर्ट घालून वातावरणापासून स्वत:चा बचाव करताना दिसून येतात. युवक मंडळीही सकाळी जॉगिग करताना, खेळायला जाताना स्पोर्टी लूकचे हुडीज घालताना दिसून येतात. सायंकाळी फिरायला जातानाही हुडीज घालण्यास पसंती दिली जाते. एवढेच नाही तर शॉपिंग, पर्यटनाला निघताना सोबत हुडीज असतेच. आपल्याला सुटेबल होणार्या कपड्यात हुडीज घेऊन आपण फॅशनबल राहू शकतो. सोसायटी मिटिंग, गेट टू गेदर, छोटेखानी कार्यक्रम आदी ठिकाणी हुडीज वापरून कन्फर्ट राहू शकतो.
र्ी कामाच्या ठिकाणी वापर : कार्यालयाची परवानगी असेल तर कामाच्या ठिकाणी हुडीजचा पेहराव करू शकतो. स्किन टाइट जिन्स, व्हाईट शर्ट किंवा नेव्ही ब्लूवर स्वेटशर्टचा पेहराव केल्यास तो ऑफिसवेअर ठरू शकतो. कार्यालय वातानुकुलीत असेल तर हुडीज काढून ठेवण्याची गरज भासत नाही. कार्पोरेट कल्चरलमध्ये फॅशनबेल कपड्यांना सहसा परवानगी दिली जात नाही. परंतु परवानगी असल्याने अधूनमधून स्वेटशर्ट घालून कामाच्या ठिकाणी फ्रेशलूक ठेवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.
र्ी पार्टी लूक: पार्टी असेल तर स्वेटशर्ट हवाच. जिन्स, टिशर्ट, बेल्ट, गॉगल आणि रिस्ट वॉच याला मॅच होणारे स्वेटशर्ट घातल्यास पार्टी जिंकलीच म्हणून समजता. आपल्याला साजेसा असणारा पेहराव केल्यास पार्टी आपल्याभोवती घुटमळत राहते. मित्रांबरोबर पार्टी लूकचा स्वेटशर्ट घातल्यास सर्वांना भूरळ पडल्याशिवाय राहत नाही. कधी कधी फुल हुडीज घालण्यापेक्षा हाफ हुडीजचा पेहराव केल्यास शर्ट आणि हुडीज याचे कॉम्बिनेशन आपले व्यक्तिमत्त्व अधिकच खुलवते.
Check Also
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …