बर्याचदा साफसफाई करूनही घराच्या कोपर्यांमध्ये धूळ आणि माती तशीच राहते. शिवाय पावसाळ्यामुळे भिंतींनाही बुरशीही लागते. जी सहसा घासूनही निघत नाही. भिंत घासल्यानंतर बुरशी तर निघेल, पण भिंतीची चमक कमी होऊ शकते. खिडया आणि दारांच्या कोपर्यात घाण जमा होते. भिंतींवरील बुरशी काढताना अनेकदा रंगही निघण्याची शयता असते. भिंतींवरचा रंग निघाल्यावर घराची शोभाही काहीशी कमी होते. घराचे कोपरे जर बुरशीमुळे घाण झाले असतील तर, काही गोष्टी फॉलो करून पाहा. भिंतींवरील डाग आणि बुरशी काढण्यासाठी आपण होममेड लीनरचा वापर करू शकता. यासाठी एका २ लिंबाचा रस घ्या. त्यात २ चमचे डिशवॉश लिक्विड आणि १ चमचा मीठ घालून मिस करा. तिन्ही गोष्टी मिस केल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. अशा प्रकारे होममेड लीनर वापरण्यासाठी रेडी.
सर्वात आधी भिंतींचे कोपरे एका कोरड्या कापडाने पुसून घ्या. जेणेकरून बुरशी निघून जाईल. आता त्यावर तयार होममेड लीनर भिंती, दरवाजा किंवा खिडयांवर स्प्रे करा. नंतर ओल्या कापडाने पुसून काढा. डाग एकाच वाइपमध्ये निघणार नाही. ही प्रक्रिया २-३ वेळा केल्याने भिंतींवरचे बुरशीचे डाग आणि काळेपणा निघून जाईल. आपण या स्प्रेने संपूर्ण घराची भिंत स्वच्छ करू शकता.
आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या मदतीनेही भिंतींवरचे डाग स्वच्छ करू शकता. यासाठी बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घ्या. त्याची पेस्ट तयार करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार लिक्विड जिथे बुरशी असेल तिथे स्प्रे करा. आणि ओल्या कापडाने पुसून घ्या.
Check Also
पहिल्यांदा बाबा बनताय?
ऑस्ट्रेलियामध्ये अंदाजे प्रत्येक दहा पुरुषांपैकी एक पुरुष आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर चिंता व …