लेख-समिक्षण

श्रेयावर कौतुकवर्षाव

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट पसरली आहे. बंगालमध्ये भाजपचे ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे.
याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. यादरम्यान, गायिका शेया घोषालने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
श्रेेया घोषालने कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट रद्द केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिले, कोलकातामध्ये भयंकर घटना घडली. एक महिला म्हणून तेथील डॉक्टरबरोबर जे चुकीचं कृत्य घडलं त्याबद्दल विचार करणे देखील कठीण आहे. मी थरथर कापतेय. मी कोलकातामधील आयोजित कॉन्सर्ट रद्द करतेय. या कॉन्सर्टची आम्हा सर्वांना खूप अपेक्षा होती. पण एक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. डहअ‍ॅशूर ॠहेीहरश्र
पुढे तिने लिहिले की, केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर या जगातील महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी मी मनापासून प्रार्थना करते. मला आशा आहे की माझे मित्र आणि चाहते माझा हा निर्णय समजून घेतील. अशा राक्षसांविरुद्ध आपण एकजूट होऊन उभे राहणे गरजेचे आहे. तसेच जर या शोची कोणीही तिकीटं घेतली असतील तर ती तिकीटं नवीन शोसाठी देखील चालू शकतील. शेया घोषालच्या या निर्णयाचं चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.- प्रसाद पाटील

Check Also

चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप

चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्‍या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *