स्टीफन विल्टशायर यांचा जन्म २४ एप्रिल १९७४ रोजी इंग्लंडमधील लंडन शहरात एका स्थलांतरित कुटुंबात झाला. तो जन्मतःच ऑटिझम स्पेट्रम डिसऑर्डर या न्यूरोलॉजिकल अडचणीने ग्रस्त होता. चार वर्षांचा होईपर्यंत स्टीफन बोलतही नव्हता. त्याला इतरांशी संवाद साधणे कठीण होते, आणि सामाजिक व्यवहारात तो सहभागी होऊ शकत नव्हता. त्याचे वडील स्टीफन लहान असतानाच एका अपघातात मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवलं. घरात खूप प्रेम होतं, पण परिस्थिती अत्यंत कठीण होती. स्टीफन लहान असतानाच त्याच्या हातात पेन्सिल दिली गेली आणि त्या क्षणाने त्याच्या जीवनाला दिशा दिली. तो शांत बसून अनेक तास चित्रं काढत असे. विशेष बाब म्हणजे स्टीफन काहीही पाहिल्यानंतर एकदाच बघून ते अचूक चित्र म्हणून उतरवू शकत होता. अगदी तंतोतंत, अचूक प्रमाणात!
त्याने प्रथम घोड्यांची चित्रं काढायला सुरुवात केली. नंतर कार, इमारती आणि अखेरीस संपूर्ण शहरंची चित्रं त्याच्या स्मरणशक्तीच्या जोरावर तयार करू लागला.
बीबीसीच्या डॉयुमेंटरीसाठी, त्यांना हेलिकॉप्टरमधून लंडन शहरावरून नेण्यात आलं. त्यांनी खाली पाहत शहराची रचना, रस्ते, इमारती, खिडया, आणि लँडमार्स डोळ्यांत साठवले. नंतर केवळ आठवणीवर आधारित त्यांनी १२ ऐतिहासिक वास्तूंसह २००हून अधिक इमारतींचं अचूक स्केच ३ तासांत पूर्ण केलं. त्याने लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, दुबई, सिंगापूर, रोम, जेरुसलेम, हाँगकाँग या शहरांची अवाढव्य चित्रं एकदाच पाहून केवळ आठवणीतून साकारली आहेत. १९८९ मध्ये केवळ १३ वर्षांचा असताना त्याचे पहिले चित्रप्रदर्शन झाले. २००६ मध्ये त्याला ब्रिटिश एमबीई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लंडनमध्ये त्याच्या नावाने ‘स्टीफन विल्टशायर गॅलरी’उभारली गेली आहे.
स्टीफन बोलू शकत नव्हता, संवाद साधू शकत नव्हता, त्याला जग खूप वेगळ्या नजरेने पाहायचं होतं. पण त्याने आपली ओळख अपंग म्हणून न करता असाधारण म्हणून निर्माण केली. ज्यांना जगाने दुर्लक्षित केलं, त्याने त्याच जगाला आपली चित्रं दाखवून मोहित केलं.
शारीरिक किंवा मानसिक मर्यादा असल्या, तरी आपल्यातील अपार क्षमतेला मेहनत आणि आत्मविश्वासाची जोड दिली तर प्रत्येक माणूस त्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती गाठू शकतो ही बाब स्टीफन यांचे उदाहरणाने स्पष्ट होत नाही काय?
Check Also
क्यूआर कोड प्रणालीच्या अंतरंगात
आजकाल ठेला लावलेल्या भाजीवाल्यापासून ते पानपट्टी चालवणार्या दुकानदारापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट स्वीकारली जाते. एक …