लेख-समिक्षण

योगनिद्रेवर नवा प्रकाश

हजारो वर्षांची परंपरा असणार्‍या योगचिकित्सेचे महत्त्व निर्विवाद आहे. पण पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या वर्गाचा असा युक्तिवाद आहे की योगाची चाचणी विज्ञानाच्या आधारे व्हायला हवी. अमेरिका, युरोप आणि विशेषतः चीनमध्ये योगावर मोठे संशोधनही सुरू आहे. काही काळापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालेल्या एका अमेरिकन न्यूरोसर्जनने प्राणायाम हा मानसिक आजारांवर सर्वात प्रभावी उपचार आहे असा दावा केला होता. आज जगभरात योगाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असली तरी योगाची ती क्रेझ भारतात दिसत नाही. देश-विदेशात योगचिकित्सेला सन्मान मिळवून देण्यामध्ये पंतप्रधान मोदींनी मोलाची भूमिका बजावली. योगचिकित्सेत प्राणायाम, मुद्रा, योगनिद्रा आदी अनेक प्रकार आहेत.
अलीकडेच, आयआयटी आणि एम्स दिल्ली यांनी एमआरआयद्वारे केलेल्या अभ्यासातून योगनिद्रेबाबत नवी माहिती पुढे आली आहे. त्यानुसार योग निद्रा केवळ झोपेची गुणवत्ता वाढवत नाही तर मन विचलित होण्याला अटकाव करुन झोपेवर नियंत्रण ठेवू शकते. योग निद्रा म्हणजे निद्रिस्तावस्था आणि जागृतावस्था यामधील एक जाणीव स्थिती आहे. योगनिद्रेचा उपयोग योगी व्यक्ती ध्यानासाठी करतात. मानसिक आरोग्यासाठी योग निद्राची उपयुक्तता निर्विवाद आहे. आता आयआयटी आणि एम्स दिल्लीच्या संशोधनात हे देखील मान्य केले गेले आहे की योगनिद्रेने चिरविश्रांती लाभते. नियमित योग आणि ध्यान करणार्‍या सहभागींची झोप नियंत्रित करण्याची क्षमता सामान्य सहभागींपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
या वैज्ञानिक संशोधनात अनेक महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार योगनिद्रा विविध प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. यामुळेच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये व्यावसायिक ताण कमी करण्यासाठी योग निद्रावर भर दिला जात आहे. दिल्लीत झालेल्या संशोधनात योग निद्राच्या माध्यमातून चैतन्याची सर्वोच्च पातळी गाठण्याची वस्तुस्थितीही मान्य करण्यात आली. संशोधकांचा असा विश्वास आहे की योगनिद्रेद्वारे, अवचेतन मनात खोलवर दडलेल्या निराशा मानसिक पृष्ठभागावर आणण्यास आणि कालांतराने त्यापासून मुक्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे व्यक्तीचे आरोग्य सुधारते. आजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकजण अतिविचार करण्याच्या समस्येशी झुंजत असताना, आपल्या मनाची भटकंती रोखण्यासाठी योग निद्रा उपयुक्त ठरू शकते. संशोधनादरम्यान तयार झालेल्या दोन गटांच्या मेंदूच्या नमुन्यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता नियमित योग करणार्‍या गटातील व्यक्तींच्या मेंदूला योग निद्रा कशी नयंत्रित करते हे उघड झाले. योग निद्राची काही मिनिटे झोप सामान्य झोपेच्या कित्येक तासांपेक्षा अधिक आरामदायी असते. योग निद्राचा कालावधी हळूहळू वाढवून चांगले परिणाम मिळू शकतात. त्याच वेळी, आपले ध्यान गहिरे वा सखोल करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. अर्थातच, प्रशिक्षित तज्ज्ञांकडून शिकून योग निद्रा केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.– रमा मिलिंद

Check Also

जा एकदाची..!

जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *