लेख-समिक्षण

बॉस ऑफिसवर ’जारण’चा बोलबाला!

जून महिन्याच्या सुरूवातीला रिलीज झालेल्या ’जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. चित्रपटाला रिलीज होऊनव आठवडा झाला असून, चित्रपटाने बॉस ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. यासोबतच प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतुक केलेच, याशिवाय चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांह समीक्षकांचे लक्ष वेधले आहे.
‘जारण’ या शब्दाचा अर्थ करणी असा केला जातो. या चित्रपटाची कथा या विषयाला घेऊन तयार करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपट अंधश्रद्धेवरही भाष्य करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जारण पाहिल्यानंतरचा अनुभव शेअर करत आहेत. याशिवाय चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या भूमिकेंची कौतुक प्रेक्षक करत आहेत. बॉलीवूड चित्रपटांच्या भाऊगर्दीत जारण हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटर्सकडे खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे.
जारण चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ लाखांची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ होत गेली. या चित्रपटाने आठवड्याभरात तब्बल २.३ कोटींचे बॉस ऑफिस कलेशन केले आहे.. ‘जारण’मध्ये मानवी भावभावना, सामाजिक गुंतागुंत आणि संघर्षाचे वास्तव हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडले गेले आहे. चित्रपटातील कथा त्याची केलेली मांडणी सीन्स गाणी असे सगळचं गुंतवूण ठेवणारे आहे.- अपर्णा देवकर

Check Also

विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. …