मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही. मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी करण्यात आला. अहवालातील गौप्यस्फोटाच्या आवाजाने बॉलिवूड देखील आश्चर्यचकीत झाले. आता सर्वच जण कास्टिंग काउचचा कलंक लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.
———–
मल्याळम चित्रपट उद्योगातील ‘ओपन डिमांड सेक्स’ ची सध्या खूप चर्चा आहे. वास्तविक दक्षिणेतील चित्रपटसृष्टी देशातील दुसरी मोठी इंडस्ट्री मानली जाते आणि या ठिकाणी कार्यरत महिलां कलाकारांचे शोषण नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. दुसरीकडे बॉलिवूड हा आपल्या चित्रपट उद्योगातील महत्त्वाचा भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांना इथल्या इंडस्ट्रीत जास्त लक्ष राहते. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मल्याळम चित्रपट उद्योगाच्या ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकता येईल.
न्यायाधीश हेमा यांचा निर्णय मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही. मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी करण्यात आला. अहवालातील गौप्यस्फोटाच्या आवाजाने बॉलिवूड देखील आश्चर्यचकीत झाले. आता सर्वच जण कास्टिंग काउचचा कलंक लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.
हमामात सर्व जण सारखेच बॉलिवूडचा विचार केला तर हमाममध्ये सर्व जण सारखेच असतात. मोठा निर्माता, फायनान्सरपासून ते त्याचे सर्व सहकारी या कास्टिंग काउचच्या निमित्ताने फायदे उचलत असतात. बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांचे पंटर एखाद्या नवख्या नायिकेला निर्मात्यांचा नवा चित्रपट देण्याच्या निमित्ताने लैंगिक शोषण करत असतात. चित्रपटाच्या भाषेत त्याला ‘तडजोड’ असे म्हणतात. वास्तविक काही निर्माते असेही असतात की त्यांना नायिकेत फार रस नसतो. परंतु या गोष्टीने खूप दिलासा मिळत नाही. एखादी नवीन नायिका निर्माता किंवा फायनान्सरच्या नजरेतून वाचली तरी ती दुसर्या ठिकाणी बळी पडते. सर्वच नव्या तारका कास्टिंग काउचच्या तडाख्यात सापडतीलच असे नाही. परंतु ज्यांच्याकडून नकार दिला जातो, त्यांना सहजासहजी चित्रपटात ब्रेक मिळत नाही. त्यापैकी काही जणी तर लुप्त होऊन जातात.
एजंटांची यादी काही नायिका अशा असतात की, त्या तडाख्यात सापडल्यानंतर अचानक तडजोड करण्यास तयार होतात. इंडस्ट्रीतील अनेक जण त्याचा पूर्णपणे फायदा उचलतात. तेथे असे काही एजंट असतात की नव्या आणि प्रस्थापित नायिकांना काम देण्याचे काम करतात. त्यांना निर्माते आणि नवोदित कलाकार असे दोघांकडून कमीशन मिळते. अशावेळी एजंट एखाद्या नायिकेला दुबई किंवा आखाती देशांत काम मिळवून देण्यात यशस्वी ठरतात. एजंटच्या कमाईला बॉलिवूडच्या भाषेत ‘दलाली’ म्हटले जाते.
भौतिक सुखाची स्पर्धा थोडेफार यश मिळताच नव्या कलाकारांची भौतिक सुखासाठी आंधळी स्पर्धा सुरू होते. चांगला फ्लॅट, महागडी मोटार, चांगले राहणीमान, महागडे कपडे या गोष्टी मिळवण्यासाठी नायक-नायिका कामाला लगातात. कारण त्यांना आता ऑटो आणि टॅक्सीत बसून संघर्ष करणे चांगले वाटत नसते. तुम्ही यासंदर्भात तडजोडीसाठी तयार असलेल्या कोणत्याही नव्या कलाकारांशी बोलू शकता. सर्वकाही मिळवण्यासाठी काही नायिका काहीही करायला तयार असतात. अशाच नायिकांवर निर्मात्यांची नजर असते. कास्टिंग काउचच्या सर्व कथा इथेच जन्माला येतात. मोठे कंत्राट किंवा अन्य कामाच्या माध्यमातून नायिकांकडे पैसा येऊ लागतो. अन्यथा तुम्ही अशा किती नव्या नायिकांचे नाव ऐकले की तिला कामाच्या बदल्यात कोट्यावधी रुपये मिळतात. साधारणपणे वीस ते पंचवीस लाखाचे मानधन दिले जाते. हा पैसा कोणत्या स्रोतातून येतो हे सविस्तर सांगण्याची गरज नाही.
तडजोड गरजेची साधारणपणे चित्रपट मिळवण्यासाठी नायकाच्या तुलनेत नायिकांना बर्याच तडजोडी कराव्या लागतात. ही तडजोड ही संबंधांच्या मार्गातूनच केली जाते. यासंदर्भात बॉलिवूडच्या किरकोळ निर्मात्याने यासंदर्भात एक मोठे कटू सत्य सांगितले. चित्रपट हवाय, तडजोड करा. काही नव्या तारका या तडजोडीच्या मार्गावरच वाटचाल करतात आणि बर्यापैकी यश मिळवतात. काही तर बिनधास्तपणे हा मार्ग निवडतात. अशावेळी त्यांचे दुबईत किंवा परदेशात सहजपणे घर तयार होते.
लहान पडदा देखील अपवाद नाही पडदा लहान असो किंवा मोठा, कोणत्याही ठिकाणी अभिनयाच्या माध्यमातून हा खेळ अतिशय गुप्तपणे सुरू असतो. अघोषित तडजोडीनुसार सर्वजण गुपचूप काम करत असतात.
मोठे नाव अन शांत शांत प्रत्यक्षात कास्टिंग काउचच्या बाबतीत एखाद्याचे नाव सांगितल्याने अनेक कायदेशीर अणि अन्य पेच निर्माण होतात. त्यामुळे उघडपणे नाव घेण्याचे धारिष्ठ्य कोणी दाखवत नाही आणि नाव जरी घेतले तरी त्याच्या वलयामुळे काही दिवसांतच दबले जाते. अन्यथा सुभाष घई, विधू विनोद चोप्रा, नाना पाटेकर, साजिद खान, अनु मलिक यांच्यासह अनेक लहान मोठे नाव या प्रसंगात चर्चेला आले आणि गेले. परंतु याबाबत स्पष्ट चित्र समोर आलेले नाही. मी टू मोहीमेमुळे काही नावे प्रकाशात आली, पण त्यांचे नाव दाबण्यास फार वेळ लागला नाही.
नाव सांगण्यासही बिचकतात कास्टिंग काउचच्या तडाख्यात अडकलेले युवक युवती हे आपले नाव प्रकाशझोतात आणण्यापासून नेहमीच बिचकतात. प्रामुख्याने नायिका या आपले नाव माध्यमात येऊ देत नाहीत. काही नायिका या प्रकरणात धाडस दाखवितात. वास्तविक नव्या तारकांनी काही कटूसत्य सांगितले आणि ते म्हणजे काही निर्मात्यांनी कथानक सांगण्याच्या निमित्ताने हॉटेलमधील खोलीत बोलावले आणि गैरवर्तन केले. पायल रोहतगी, महिमा चौधरी, तनुश्री दत्ता यांनी तर जाहीरपणे चित्रपट देण्याच्या नावाखाली चुकीच्या ऑफर देण्यात आल्याचे सांगितले. सध्या बॉलिवूडपासून दूर असणारी पायल रोहतगी म्हणते, “मला मोठ्या चित्रपटात काम देण्याच्या निमित्ताने अनेक घृणास्पद ऑफर दिले, परंतु मी नम्रपणे तर कधी कठोरपणे त्यास नकार दिला. पण तुम्ही पाहताय की यानंतर मला बॉलिवूडवाल्यांनी खड्यासारखे मला बाजूला काढले.”
ना कोणाला भिती मुळ प्रश्न असा की असे घृणास्पद कृत्य करताना बहुतांश निर्मात्यांना कोणतीही भिती वाटत नाही. ते बिनधास्त नशापान करतात आणि अशा प्रकारचे अनेक घृणास्पद खेळ आरामात खेळत राहतात. अशा रितीने कास्टिंग काउचचा डर्टी पिक्चर बॉलिवूडमध्ये सुरूच राहतो. – सोनम परब, सिनेअभ्यासक
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …