लेख-समिक्षण

नायकांची बदलती प्रतिमा

करण जोहर हा केवळ दिग्दर्शक नाही, तर एक भावनिक निवेदनकर्ताही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने मान्य केलं आहे की बालपणात त्याला मुलखातला नाहीस असं म्हटलं जायचं. त्याच्या आवाजावर, वावरण्यावर आणि हसण्यावर टिका व्हायची. या सामाजिक दडपणातून त्यानं एक वेगळा संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला, जो त्याच्या सिनेमांमधून प्रकट होतो. त्याच्या कथानकांमध्ये पुरुषांचा भावनिक संघर्ष आणि लैंगिक भूमिका या मुद्द्यांचा मूक उल्लेख सतत होत असतो. २०१८ च्या ‘लस्ट स्टोरीज’ मधील त्याच्या कथेत स्त्रीचा लैंगिक आनंद केंद्रस्थानी होता आणि पुरुष पात्र त्यात विनम्र सहभागी होता. ही भूमिकांची पुनर्रचना करण जोहरसारख्या मुख्य प्रवाहातील दिग्दर्शकाकडून येणं याचं वेगळंच महत्त्व आहे.
—-
साधारण २००० सालापूर्वी बॉलिवूडमधील प्रेमकथांचा विषय निघाला की प्रेक्षकांच्या मनात पारंपरिक नायकाची प्रतिमा उभी राहात असेे. हा नायक सामान्यतः देखणा, ताकदवान, साहसी आणि स्त्रीवर वर्चस्व गाजवणारा. पण १९९८ साली करण जोहरच्या पदार्पणाने ही प्रतिमा हळूहळू बदलू लागली. ‘कुछ कुछ होता है’ पासून ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’पर्यंतच्या प्रवासात त्याने अशा पुरुष नायकांना समोर आणलं जे हळवे होते, आत्मपरीक्षण करणारे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीला समकक्ष जोडीदार म्हणून मान्यता देणारे होते.
करण जोहरच्या चित्रपटातील पुरुष पात्रं पारंपरिक मर्द किंवा पुरुषी संकल्पनेला आव्हान देतात आणि प्रेम, मैत्री, समजूतदारपणा व बदल यांचं प्रतिबिंब बनून उभे राहतात.
कभी खुशी कभी ग़म (२००१) मधील एक अजरामर दृश्य आठवून पहा. दिल्लीच्या चांदणी चौकात अंजली (काजोल) रस्त्यावर नाचते आहे. ती मुक्त आहे, आनंदी आहे, त्या क्षणी तिच्या अस्तित्वात कोणतीही कृत्रिमता नाही. दुसरीकडे राहुल रायचंद (शाहरुख खान) थांबतो. त्याची नजर स्थिर होते. पार्श्वसंगीत वाजतं, संपूर्ण वातावरण हळूगतीत जातं. हाच क्षण दर्शकाला सांगतो की, हे प्रेम आहे. या प्रसंगातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राहुलची नजर. ती कामुक नाही, तिच्यात मालकी हक्क गाजवायचा हेतू नाही. ती नजर विस्मयकारक आहे, स्त्रीविषयीच्या जाणीवेची आहे.
याच चित्रपटात अंजलीच्या वडिलांचं निधन होतं, तेव्हा राहुल तिच्या डोयावर हात ठेवतो ‘ तू आता माझी जबाबदारी आहेस’ अशा अर्थानं. पण ही कृतीही जबरदस्तीची नसते; ती प्रेमाने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यात कुठेही पितृसत्ताक दबाव जाणवत नाही.
याच काळात आलेला ‘गदर: एक प्रेम कथा (२००१)’ हा चित्रपट आठवा. त्यातील नायकाच्या सवयी, वृत्ती आणि स्त्रीविषयीच्या दृष्टिकोनामुळे हा नायक खूपच वेगळा भासतो. सकीना पळत येते आणि ताराच्या पायांवर पडते. तारा तिचे रक्षण करतो, गुंडांना धमया देतो, आणि तिच्यावर हक्क प्रस्थापित करतो. इथे प्रेम म्हणजे मालकी हक्क आहे. नायक स्त्रीच्या आयुष्यात उतरतो आणि तिचं जीवन बदलतो. प्रेमाची भावना आहे, पण ती समांतरतेच्या पातळीवर नाही. या दोन पात्रांची तुलना केल्यास स्पष्टपणे जाणवतं की, करण जोहरने प्रेमकथेतील पुरुषाला एका वेगळ्याच आदर्शात बसवलं आहे. जिथे तो रक्षक नाही, तर सहचर आहे.
कभी अलविदा ना कहना (२००६) मधील देव (शाहरुख खान) हे पात्र अधिक गुंतागुंतीचं आहे. तो वैवाहिक जीवनात अडकलेला आहे, आणि माया (राणी मुखर्जी) हीसुद्धा एका अशाच नात्यात आहे. जेव्हा ते भेटतात, संवाद करतात, तेव्हा त्यांच्या संवादात बरेचदा आत्मपरीक्षण, समजूतदारपणा आणि मनस्वीपणा जाणवतो. देव तिला विचारतो, ” तू खरंच प्रेम करतेस का तुझ्या होणार्‍या नवर्‍यावर?” त्याच्या बोलण्यात कधीकधी मॅन्सप्लेनिंग जाणवते. पण तो संवादाचा सूर आक्रमक नसतो. त्याच्या मागे एक उत्कट इच्छा असते. प्रेम म्हणजे फक्त जबाबदारी नसून मैत्री, सवय, आणि सहवेदनेचा एकत्र प्रवास आहे.
करण जोहरने स्वतः एका मुलाखतीत कबूल केलं की त्या काळातील त्याच्या लिंगभावी दृष्टिकोनात त्रुटी होत्या. ‘कुछ कुछ होता है’मधील राहुल फक्त गोडसर आणि साडी नेसलेल्या अंजलीशी प्रेम करू शकतो, हे त्याचं बालपणातील सिनेमांच्या प्रभावाचं प्रतिबिंब होतं. पण त्यानंतरच्या त्याच्या चित्रपटांत ही त्रुटी नजरेस येत नाही.उलट त्यात एक स्पष्ट बदल दिसतो, तो म्हणजे स्त्री-पुरुष नात्यांमध्ये समता आणि मैत्री.
करण जोहरच्या सिनेमांत मैत्री ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. कुछ कुछ होता है मध्ये राहुल म्हणतो प्यार दोस्ती है. हे एक वाय असलीेतरी त्यामागे एक सामाजिक विधान आहे की स्त्री-पुरुष नातं हे वर्चस्वाच्या पायावर आधारित नसलं पाहिजे, तर ते समतेवर, मैत्रीवर आणि परस्पर सन्मानावर आधारित असावं.
हे विचार बॉलिवूडमध्ये अपवादात्मक आहेत. कारण बहुतांश चित्रपटांत प्रेम म्हणजेविजय, गोड जबरदस्ती किंवा प्रेयसीला जिंकून घेणं असं काहीतरी मानलं जातं. करण जोहर याच्या विरोधात जाऊन सांगतो प्रेयसीला जिंकायचं नसतं, समजून घ्यायचं असतं.
२०१६ मध्ये आलेला ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट भावनिक गुंतागुंतीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अयान (रणबीर कपूर) आणि अलिजा (अनुष्का शर्मा) यांच्यातील नातं प्रेमाहून अधिक काहीतरी आहे, पण तरीही त्यात प्रेमाची अनिश्चितताही आहे. अयान हा एक लासिक नायक आहे. हळवा, कलात्मक आणि स्वतःच्या भावना स्पष्ट बोलणारा. तो अलिजावर जीवापाड प्रेम करतो. पण अलिजा त्याला फक्त एक मित्र म्हणूनच स्वीकारते. येथे एक महत्त्वाचा टप्पा उभा राहतो. जेव्हा पुरुषाचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला जातो, तेव्हा तो तिला दोष देतो का? की तो तीच्या निर्णयाचा सन्मान करतो? चित्रपटात अयानच्या वर्तनात सुरुवातीला एक आक्रोश आहे. तो अलिजावर चिडतो, तिच्या निर्णयाला चुकीचं ठरवतो. ही बाब काही प्रमाणात स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात वाटू शकते. पण पुढे जाऊन त्याचं मनपरिवर्तन होतं. अलिजा जेव्हा कर्करोगाशी लढा देत असते, तेव्हा अयान तिच्यासोबत राहतो, प्रेमाचा आग्रह न धरता, केवळ तिचा आधार बनून. हा प्रवास महत्त्वाचा आहे. करणने येथे दाखवलं की पुरुष नायकही शिकू शकतो, चुकू शकतो आणि शेवटी परिपक्वतेने वागू शकतो. त्याच्या भावनांचा आदर झाला नाही म्हणून तो हिंसक होत नाही, हेच स्त्रीवादी दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या वेळी तो आणखी पुढे गेला. त्याने रॉकी (रणवीर सिंग) या पात्राच्या माध्यमातून एक पूर्णतः नवा पुरुष उभा केला. रॉकी हा आरंभी टिपिकल माचो माणूस वाटतो. बॉडीबिल्डर, थोडा मूर्ख, आणि भावनिकदृष्ट्या अपरिपक्व. पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो, तसतसा तो एक वेगळाच प्रवास करतो. रॉकीचे संवाद लक्षवेधी ठरतात. तो स्त्रियांच्या प्रश्नांबाबत शिकतो, गृहकार्यासंबंधी भूमिका स्वीकारतो आणि सार्वजनिकरित्या नृत्य करतो. या चित्रपटात पुरुष नायकाने पुरुषत्व म्हणजे काय याविषयी स्वतःला विचारायला सुरुवात केली आहे. करण जोहरच्या चित्रपटात पुरुष रडतात. आणि ही कृती ते लपवून करत नाहीत. शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग हे सर्व नायक स्क्रीनवर अश्रू ढाळताना दिसतात. हे अश्रू सशक्त भावनिक संवाद ठरतात.
करण जोहर हा केवळ दिग्दर्शक नाही, तर एक भावनिक निवेदनकर्ताही आहे. त्याच्या आत्मचरित्रात त्याने मान्य केलं आहे की बालपणात त्याला मुलखातला नाहीस असं म्हटलं जायचं. त्याच्या आवाजावर, वावरण्यावर आणि हसण्यावर टिका व्हायची. या सामाजिक दडपणातून त्यानं एक वेगळा संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला, जो त्याच्या सिनेमांमधून प्रकट होतो. त्याच्या कथानकांमध्ये पुरुषांचा भावनिक संघर्ष आणि लैंगिक भूमिका या मुद्द्यांचा मूक उल्लेख सतत होत असतो. २०१८ च्या ‘लस्ट स्टोरीज’ मधील त्याच्या कथेत स्त्रीचा लैंगिक आनंद केंद्रस्थानी होता आणि पुरुष पात्र त्यात विनम्र सहभागी होता. ही भूमिकांची पुनर्रचना करण जोहरसारख्या मुख्य प्रवाहातील दिग्दर्शकाकडून येणं याचं वेगळंच महत्त्व आहे.
करण जोहरने पुरुष नायकाला केवळ शारीरिक बलावर नाही, तर भावनिक जाणीवेवर उभं केलं. त्याचे पात्र गोंधळलेले असते. कधी स्वार्थी, कधी दयाळू, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शिकतात. हे पात्र स्त्रीला समकक्ष मानतात, तिच्या निर्णयांचा सन्मान करतात आणि आपली पुरुषत्वाची चौकट ओलांडतात. आज जेव्हा अनेक सिनेमे अजूनही नायक नायिकेला पळवून नेतो या साच्यात अडकले आहेत, तेव्हा करणचा नायक प्रेमात नजाकत आणतो. त्याच्या सिनेमांतून एक स्पष्ट संदेश मिळतो की खरा नायक तोच जो स्वतःलाही समजून घेईल आणि समोरच्याला देखील आपलं व्यक्तिमत्त्व साकार करू शकेल अशी संधी देईल.- सोनम परब

Check Also

अमिताभ बनणार जटायू

बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात …