लेख-समिक्षण

देशात पुन्हा सांप्रदायिक आग

गणपती विसर्जनावेळी कर्नाटकातील नागमंगला शहरात बुधवारी दोन गटात झालेल्या हिंसाचारात मोठे नुकसान झाले आहे. विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर हाणामारी झाली आणि मग हिंसाचाराला सुरुवात झाली. यावेळी दगडफफेक करून अनेक दुकाने, वाहने पेटवली. त्याच दिवशी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत आंदोलन सुरू केले. अनधिकृतपणे उभारलेली मशीद पाडण्याची मागणी करण्यात आली.
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला शहरात बुधवारी गणपती विसर्जनावेळी दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर हिंसाचार झाला. हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. या हिंसाचारात नागमंगला शहरात दोन्ही गटातील समाजकंटकांकडून अनेक दुकानांना आग लावण्यात आली. ज्यात रंग, बाईक शोरूम आणि कपड्यांच्या दुकानांचा समावेश आहे. ही सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत. हिंसाचारात रस्त्यांवरील गाड्यांना लक्ष्य करण्यात आले. ज्यामुळे तणाव आणखी वाढला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी परिसरात हाय अलर्ट दिला. तसेच बीएनएस कलम 163 लागू करण्यात आले. ज्यामुळे लोकांना एकत्र येण्यापासून रोखता येईल आणि जमाव एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बदरिकोप्पलू गावातील युवकांनी गणपती विसर्जनाची मिरवणूक काढली होती. ही मिरवणू्क नागमंगला शहराच्या मुख्य रस्त्यावरून जात असताना तेथे असलेल्या एका मशिदीजवळ मिरवणुकीवर दगडफफेक झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटात हाणामारी सुरू झाली. अशात काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड सुरू केली. दोन वाहनांना आग लावली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्यात आंदोलन केले आणि हिंसाचार करणार्‍यांना अटक करण्याची मागणी केली. अशाच प्रकारची घटना दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या सुरत शहरात झाली होती. सुरतमध्ये एका गणेश मंडळावर काही लोकांनी दगडफफेक केली. ज्यानंतर संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला. जमावाने दगडफेक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा 6 जणांना अटक केली. त्यानंतर पुन्हा 27 जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांवर हिंसाचार भडकावण्याचा आरोप ठेवण्यात आला.
शिमल्यातील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटनांनी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संजौली चौकात एकत्र येत मशिदीला घेराव घातला. त्यांनी आंदोलन करत अनधिकृत मशिदीला विरोध करत ती पाडण्याची मागणी केली आहे. शिमला महानगरपालिका आयुक्त भूपेंद्र अत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीसाठी केवळ एक मजली इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र अनधिकृतपणे तीन मजले उभारण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून वक्फ बोर्डलाही यात पक्षाकार करण्यात आले आहे. हे प्रकरण जेव्हापासून न्यायालयात गेले आहे, तेव्हापासून मशिदीमध्ये कोणतंही नवं बांधकाम करण्यात आलेलं नाही. या प्रकरणात अनधिकृत, बेकायदेशीर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही भूपेंद्र अत्री यांनी सांगितले.
या आंदोलनानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संजौलीसह आजूबाजूच्या परिसरात एक हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली. दरम्यान, मागील आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी मल्याणामध्ये हिंदी आणि मुस्लीम समुदायात झालेल्या वादानंतर हे प्रकरण पुढे आले. मुस्लीम समाजातील एका व्यक्तीने एक स्थानिक दुकानदार यशपाल सिंगवर हल्ला झाला, असा आरोप करण्यात आला. यात त्या व्यक्तीला 14 टाके पडले. त्यानंतर आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केलाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती.औद्योगिकीकरणामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत हे बंदर सापडले आहे.

Check Also

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *