अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. नुकतंच तिनं राजेश मापुस्कर दिग्दर्शित ’येक नंबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने लिखाण क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ती आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून तिहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘येक नंबर’ या चित्रपटात निर्मिती आणि लेखनाव्यतिरिक्त ती अभिनय करतानाही दिसणार आहे. या चित्रपटात तेजस्विनी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका निभावणार आहे. एकाच वेळी अशा तिहेरी भूमिकेत पाहणे, म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित, तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. राजेश मापुस्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. धैर्य घोलप, सायली पाटील हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.- मानसी जोशी
Check Also
छप्परफाड कमाई
‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स …