लेख-समिक्षण

तुमचा फोन हैक झाला आहे का?

फोन हॅक करून त्या फोनमधील डेटा दुसरीकडे पळवला जातो व त्याआधारे सायबर फ्रॉड केले जातात. फोन हॅक झाला आहे का ते ओळखण्यासाठी फोनच्या डायलरमध्ये जाउन ‘स्टार हॅश ६७ हॅश’ डायल करा. दोनचार सेकंदात एक लिस्ट स्क्रीनवर दिसेल. त्यात कॉल, डेटा, मेसेजेस इ.फॉरवर्ड होत आहेत का ते कळेल. यातले एखादे फॉरवर्ड होतंय कळल्यावर डायलरमध्ये जाउन हॅश हॅश ००२ हॅश डायल करा. हे करताच सर्व फॉरवर्डिंग अनफॉरवर्डिंग होऊन फोन सुरक्षित होईल. सावध रहा, व इतरांनाही सावध करा.
फोन हॅक झाल्याची इतर काही प्रमुख लक्षणे :
कार्यक्षमतेत घट – फोन अचानक खूप हळू चालतो किंवा अ‍ॅप्स क्रॅश होतात.
बॅटरी लवकर संपणे – फोन सामान्यपेक्षा जास्त लवकर चार्ज होतो. फोन गरम होणे – फोन सतत गरम राहतो.
अपरिचित अ‍ॅप्स – तुमच्या फोनमध्ये तुम्हाला माहित नसलेले नवीन अ‍ॅप्स दिसतात. अनपेक्षित मेसेजेस आणि कॉल – तुमच्या फोनमध्ये तुम्हाला माहित नसलेल्या व्यक्तींकडून मेसेजेस किंवा कॉल येतात. खात्यांमध्ये प्रवेश गमावणे – तुम्ही तुमच्या सोशल मीडिया किंवा इतर खात्यांमध्ये लॉग इन करू शकत नाही. कॅमेरा इंडिकेटर चालू – तुम्ही कॅमेरा वापरत नसतानाही कॅमेरा इंडिकेटर चालू असतो. स्क्रीन फ्लॅशिंग – स्क्रीन अचानक फ्लॅश होते. फोन सेटिंग्ज बदलणे – फोनच्या सेटिंग्ज अचानक बदलतात. कॉल रेकॉर्डिंग – तुमच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्ड होत असल्याची शंका येते.
हॅकिंग टाळण्यासाठी काय करावे ?
* तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस अ‍ॅप वापरा.
* तुमची अ‍ॅप्स, ऑपरेटिंगसिस्टम नियमितपणे अपडेट करा.
* तुमच्या खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
* अज्ञात अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा.
* तुमचा फोन सार्वजनिक वायफायवर कनेट करणे टाळा.

Check Also

टोनिंग का गरजेचे?

स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी लेन्सिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही तीन महत्त्वाची पावले आहेत. …