अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण काही वर्षांनी ते वेगळे झाले. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता सामंथा रुथ प्रभूच्या लव्ह लाईफबद्दलही बातम्या येत आहेत. वृत्तानुसार, सामंथा रुथ प्रभू ही दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याची अफवा आहे. ते एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्या येत आहेत. समंथा आणि राज वेब शोमध्ये एकत्र काम करत आहेत. सामंथाने राजच्या शो द फॅमिली मॅन 2 मधून ओटीटी पदार्पण केले आणि आता ती त्याच्या सिटाडेल शोमध्ये दिसते.
द फॅमिली मॅन 2 मध्ये सामंथाच्या अभिनयाचे सर्वानी कौतुक केले. या सिरीजमध्ये ती अॅक्शन करताना दिसली. आता चाहत्यांनाही सिटाडेलबद्दल खूप उत्सुकता आहे. या संदर्भात समंथा आणि राज यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. समंथा आणि नागाबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी 2017 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना धक्का बसला. यानंतर समंथा चांगलीच तुटली होती. 2022 मध्ये तिने सांगितले की ती मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. तेव्हापासून अभिनेत्रीने स्वत:ला मजबूत ठेवले आहे. काही काळ कामातून ब्रेकही घेतला. आता ती पुन्हा अॅक्शनमध्ये आली आहे. सिटाडेलबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता वरुण धवनही यात दिसणार आहे. या शोचा टीझरही रिलीज झाला आहे. हा टीझर चाहत्यांना खूप आवडला.-स्वाती देसाई
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …