इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष नुकताच शमला. पण या संघर्षात इराणने लस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर आहे.हा बॉम्ब सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्यासाठी ओळखला जातो.
लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
लस्टर बॉम्ब हा अनेक लहान बॉम्ब एका मोठ्या क्षेत्रावर टाकण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. हा बॉम्ब थेट लक्ष्यावर स्फोट करण्याऐवजी हवेतच उघडतो आणि संपूर्ण भागात छोटे-छोटे बॉम्ब टाकतो. हे बॉम्ब खाली पडताना एखाद्या वस्तूला लागले की फुटतात.
लस्टर बॉम्ब बहुधा उंचीवरच स्फोट घडवून आणतात, जेणेकरून त्यातून बाहेर पडणारे लहान बॉम्ब जास्त मोठ्या क्षेत्रावर विखुरले जातील आणि अधिक नुकसान करू शकतील. इराणने लस्टर बॉम्बने जो हल्ला केला, त्यामध्ये बॉम्ब जमिनीपासून ७ किलोमीटर उंचीवरच फुटला होता. यामुळे इस्राईलच्या ८ किलोमीटर क्षेत्रात सुमारे २० लहान बॉम्ब पडले. त्यानंतर इस्राईल सैन्याने सामान्य नागरिकांना सूचना दिल्या की, कोणत्याही वस्तूला हात लावू नका.
लस्टर बॉम्ब वादग्रस्त का आहेत?
लस्टर बॉम्बमधून पडणार्या अनेक लहान बॉम्बचा हल्ल्याच्या वेळी स्फोट होतोच असे नाही. बरेचदा ते इतरत्र पडून राहतात. पण जेव्हा कोणी व्यक्ती त्यांना हलवतो तेव्हा ते बॉम्ब फुटू शकतात. युद्धाच्या स्थितीत अनेक बॉम्ब न फुटता तसेच राहतात. पण जेव्हा सामान्य नागरिक किंवा बचाव कार्यकर्तेत्यांच्या संपर्कात येतात, तेव्हा ते फुटतात. परिणामी, युद्धात सहभागी नसणारे किंवा जखमी लोकांना मदत करण्यासाठी आलेले मरण पावण्याचा धोका असतो. त्याचबरोबर हा बॉम्ब एखाद्या विशिष्ट जागेला लक्ष्य करत नाही, तर संपूर्ण क्षेत्रात लहान स्फोट करतो. यामुळे जीवितहानी अधिक होते. यामुळेच क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
लस्टर बॉम्ब पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा कसे वेगळे आहेत?
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे एका ठराविक जागेवर हल्ला करतात. परंतु लस्टर बॉम्ब मोठ्या भागात लहान बॉम्बांनी स्फोट घडवतो. साहजिकच घनदाट वस्तीच्या भागांमध्ये ते अधिक धोकादायक बनवतात.
लस्टर बॉम्बवर बंदी आहे का?
२००८ मध्ये लस्टर बॉम्बच्या वापराविरोधात एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. या करारात लस्टर बॉम्बच्या वापर, साठवणूक, हस्तांतरण आणि उत्पादनावर बंदी घालण्यात आली. एकूण १११ देश आणि १२ इतर संस्थांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. पण इराण, इस्राईल आणि अमेरिका यांसारख्या प्रमुख लष्करी शक्तींनी या कराराचा भाग होण्यास नकार दिला. असे म्हटले जाते की, २०२३ मध्ये अमेरिकेने युक्रेनला लस्टर बॉम्ब दिले होते, जे रशियाविरोधात युद्धात वापरले गेले.
भारत याचा वापर करतो का?
भारताकडून आजपर्यंत लस्टर बॉम्बच्या वापर केल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तथापि, भारताने लस्टर बॉम्बवर बंदी घालणार्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे गरज भासल्यास भारतही याचा वापर करू शकतो.-विनायक सरदेसाई
Check Also
व्हॉट्सअपची कोलांटउडी
व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना …