रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅनसन 1970 सालात वीस वर्षाचा होता. पण डोक्यात स्वतःच व्यवसाय करायचा असे वारे शिरले होते. त्यांनी लोकांच्या घरी पार्सलने रेकॉर्ड पोहोचवण्याचा व्यवसाय करून पाहायचा असे ठरवले. त्यासाठी लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट वर एक दुकान उघडले. तेव्हा निर्यातीच्या दर्जाच्या रेकॉर्डस विकण्याच्या प्रयत्नात चौकशी करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाता-जाता राहिले कारण ब्रॅनसनने 33 टक्के कर चुकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ब्रेनसन यांच्या पालकांना त्यांची संपत्ती गहाण ठेवावी लागली. ब्रेनसनला या व्यवसायातून आ़युष्यभराचा धडा मिळाला तो म्हणजे चुकीच्या कामांतून प्रगती करण्याचा विचार करू नये, तो चुकीचा आहे. हा धडा लक्षात ठेवून 1972 मध्ये त्यांनी निक पॉवेल याच्याबरोबर भागीदारीत व्हर्जिन रेकॉर्डस या व्यवसायाची सुरूवात केली. आज 400 कंपन्यांचा मालक असलेला, मूळ भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेला रिचर्ड ब्रेनसन अब्जाधीश उद्योगपतीआहे.
2012 मध्ये मुंबईतील रस्त्यावर देखील नाचताना-गाताना दिसला होता. त्यावेळी तो येथील व्हर्जिन अटलांटिक कंपनीची मुंबई-लंडन फ्लाईटला री-लॉन्च करायला पोहचला होता. मस्तीखोर रिचर्ड आपल्या ड्रामेबाजीने नेहमीच चर्चेत राहतो. रिचर्डचा जन्म 18 जुलै 1950 रोजी झाला होता. काही वर्षापूर्वी तो एयर एशियाच्या एका फ्लाईटने पर्थ ते क्वालालांपूर पर्यंत एयर होस्टेस बनून ड्रिंक सर्व्ह करताना दिसला होता. रिचर्डला असे यासाठी करावे लागले कारण, तो एयर एशियाचे प्रमुख टोनी फर्नाडिंस यांच्यासोबत पैज हारला होता. खरं तर, 2010 मध्ये अबुधाबीत झालेल्या फॉर्म्यूला वन ग्रँड प्रिक्सच्या दरम्यान रिचर्ड आणि टोनी यांच्यात पैज लागली की, ज्याची टीम हारेल त्याने दुस-याच्या एयरलाईन्समध्ये एयर होस्टेस बनून ड्रिंक सर्व्ह करायची. रिचर्ड पैज हारला आणि प्रामाणिकपणे आपले आश्वासन पूर्ण केले.
एकदा पैज लावल्यावर त्यानुसार च्या परिणामांना समोरी जातांना आपण आपले शब्द जपायलाच हवे हे वरील उदावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …