लेख-समिक्षण

एसडी कार्ड खराब झालंय?

इंटर्नल मेमरीची क्षमता कमी असल्याने अनेक मोबाईलधारकांचा सर्व डाटा एसडी कार्डवरच असतो. मात्र जर अचानक आपले एसडी कार्ड खराब झाले तर आपण गोंधळून जातो. अनेक प्रयोग करुनही जर मेमरी कार्ड काम करत नसेल तर आपण घाबरून जावू नका. कारण मेमरी कार्ड खराब झाले तरी त्यातील डाटा कसा मिळवावा याबाबतची माहिती देणार आहोत. मेमरी कार्ड खराब झाले तरी आपण डाटा रिकव्हर करू शकतो.
डाटा कसा मिळवायचा : सर्वात अगोदर मेमरी कार्ड कोणत्याप्रकारचे आहे, हे जाणून घ्या. मेमरी कार्ड दोन प्रकारचे असतात. हे फार कमी लोकांना ठावूक असेल. साधारण आणि उच्चक्षमतेचे असे दोन प्रकार असतात. मेमरी कार्ड रिकव्हर करण्यापूर्वी त्याची प्रकार माहित असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या कार्डाची वेगवेगळी मेमरी असते. (अनेकदा असे आढळून आले की एसडी कार्ड स्कॅन केले तर अडचणी सहजपणे दूर होऊ शकते)
आता माय कॉम्प्युटर किंवा विंडोज एक्स्पोलररमधून कार्ड सर्च करावे. त्यानंतर आपल्यासमोर पॉपअप मेनू येईल. त्यात प्रॉपर्टीजमध्ये जावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर आणखी एक विंडो सुरू होईल आणि त्यातून पायचार्ट तयार झालेला असेल.
पायचार्टनंतर टूल्स टॅबला निवडून एरर चेकिंगच्य बटनला क्लिक करा आणि त्यानंतर फिक्सिंग फाईल सिस्टिम एररच्या चेक बॉक्सवर क्लिक करणे गरजेचे आहे. आपल्याला येथे सांगणे गरजेचे आहे की, रिडरला कोणताही ड्राइव्ह लेटर जोपर्यंत असाइन करणार नाही तोपर्यंत कॉम्प्यूटर कार्ड वाचणार (रिड) नाही. परंतु जेव्हा क्लिक करतो तेव्हा तो ड्राइव्ह इन्सर्ट करण्याची सूचना मिळते. याचाच अर्थ असा की कार्ड रीड होत नाही.
काही एसडी कार्डला रीड करण्यासाठी आपल्या डिव्हाइसमध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची गरज आहे. जर हे सॉफ्टवेअर अगोदरच उपलब्ध असतील तर एसडी कार्ड रीड होण्यास कोणतीच अडचण येणार नाही. यासाठी डिव्हाईसचे उत्पादन करणार्‍या कंपनीच्या संकेतस्थळावर जावून अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Check Also

सौंदर्यप्रसाधने वापरताय?

आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *