लेख-समिक्षण

ऋषभ शेट्टीचा खतरनाक लुक

दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ’कांतारा: चॅप्टर १’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. बहुप्रतिक्षित ’कांतारा: चॅप्टर १’चा जबरदस्त पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये हातात शस्त्र घेऊन ऋषभ खूपच आक्रमक दिसत आहेत.निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून ’कांतारा: चॅप्टर १’चे नवीन पोस्टर शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे.
चित्रपटाच्या पोस्टर मध्ये एक अत्यंत भव्य युद्ध दृश्य पाहायला मिळत आहे. कन्नड आणि हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट चाहते इंग्रजी, तमिळ, तेलुगूसह एकूण सात भाषांमध्ये पाहू शकतील. निर्मात्यांनी सात वेगवेगळ्या भाषांमधील पोस्टरही शेअर केले आहेत.
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ’कांतारा’ चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाही, तर भारतीय संस्कृती आणि लोक कथांना जागतिक व्यासपीठावर सादर केले. त्यामुळे चाहते आता ’कांतारा: चॅप्टर १’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कांताराबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शनही ऋषभनेच केलं होतं. १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात ३०९ कोटी रुपये कमावले होते. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. यानंतर आता ’कांतारा: चॅप्टर १’ चित्रपट २ ऑटोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.- नरेंद्र क्षीरसागर

Check Also

अमिताभ बनणार जटायू

बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात …