गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ’आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि जुई भागवत हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात काही रहस्यमय घटना घडताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. त्यामुळे रोहित चौहनचे रहस्य उलगडणार आहे. ’
‘हसणं की फसणं ?’ असं कॅप्शन देत या चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहे. 18 ऑक्टोबरला हा रोहित चौहान नेमका कोण आहे याचे रहस्य समोर येणार आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. पोस्टरवर सेल्फीत दिसणारे चेहरे आणि मागे दिसणार्या चेहर्यांवरील हावभाव खूप वेगळे आहेत. या चेहर्यांमध्ये काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते आहेत. तर ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत हे कलाकार पाहायला मिळणार आहे. सध्या अमृता खानविलकर ’झी मराठी’ वाहिनीवरील ’ड्रामा ज्युनियर्स’ या रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून दिसत आहे.- किर्ती कदम
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …