लेख-समिक्षण

अमिताभ बनणार जटायू

बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजवर रामाच्या भूमिकेत वावरलेले अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर अमिताभ बच्चन जटायू बनणार आहेत.
दोन भागात प्रदर्शित होणार्‍या ‘रामायणात’ राम म्हणून रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसतील. रावणाची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता यशने स्वीकारली आहे. नितेश तिवारींच्या रामायणात हनुमानाची भूमिका सनी देओलकडे गेली आहे.
अरुण गोविल हे दशरथाच्या भूमिकेत काम करणार आहेत. इंदिरा कृष्णन या माता कौशल्या तर लारा दत्ता या कैकयीच्या भूमिकेत आहेत. ‘बेबी जॉन’ आणि ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात दिसलेली शीबा चढ्ढा ही मंथरेच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल ही शूर्पणखेच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे. तिच्या पतीची म्हणजेच विद्युतजीवाची भूमिका विवेक ओबेरॉयच्या वाट्याला आली आहे. रवि दुबे आणि आदिनाथ कोठारी अनुक्रमे लक्ष्मण आणि भरत यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन जटायू बनणार आहेत. कुणाल कपूरला इंद्रदेवाची भूमिका मिाली आहे. पहिल्या भागासाठी ८३५ कोटींचे बजेट असल्याचे समजते. – विधिषा देशपांडे

Check Also

विमान अपघातांचे रुपेरी चित्रण

अहमदाबादच्या दुर्दैवी विमान अपघाताने देश हादरला. तब्बल २५० प्रवाशांचा या अपघातात अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. …