लेख-समिक्षण

अद्वितीय अभियांत्रिकीतील कौशल्य‘लता’

जम्मू आणि काश्मीरच्या उंच कड्यांमध्ये उभारलेला चिनाब रेल्वे ब्रिज म्हणजे केवळ एक अभियांत्रिकी आश्चर्य नव्हे, तर भारतीय विज्ञान, चिकाटी आणि नवे तंत्रज्ञान यांच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक आहे. ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाच्या यशामागे भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. जी. माधवी लता यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले आहे. त्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिलारस अभियांत्रिकी (रॉक इंजिनीअरिंग) या विशिष्ट शाखेच्या तज्ञ आहेत. चिनाब ब्रिजच्या बांधकामात त्यांनी तब्बल १७ वर्षांचा प्रदीर्घ काळ समर्पित केला. त्यांच्या सल्ल्यानेच या प्रकल्पात भक्कम पाया आणि डोंगर उतारांचे स्थिरीकरण शय झाले. या प्रकल्पात सुरुवातीस त्यांच्या सोबत आणखी एक सल्लागार होते, मात्र काही वर्षांत त्यांनी हा प्रकल्प सोडला. मात्र माधवी लता यांनी २०२२ पर्यंत प्रकल्प सल्लागार म्हणून अखेरपर्यंत जबाबदारी निभावली.
पुलाचा भाग ज्या ठिकाणी उभारण्यात आला, ते भूकंपप्रवण, जटिल भूगर्भरचना असलेले आणि उंच-सखल उतारांनी व्यापलेले क्षेत्र असल्याने, डोंगर उतारांवर योग्य बळकटीकरण आणि भक्कम पाया उभारणे हे फारच मोठे आव्हान होते. उत्खननाच्या वेळी अनेक वेळा अशा खडकांची किंवा जमिनीच्या स्थितीची अडचण आली जी आधीच्या सर्व्हेतून लक्षात आली नव्हती ‡ उदा. तडा गेलेले खडक, लपलेली पोकळी, विविध गुणधर्म असलेली जमिन. अशा वेळी प्रा. लता आणि त्यांच्या पथकाने डिझाईन-जसे-जाते तसे ही कार्यपद्धती अवलंबली. यामध्ये भूमिगत वास्तवाच्या आधारे जागीच डिझाइनमध्ये आवश्यक ते बदल करणे आणि त्या अनुषंगाने अभियांत्रिकी उपाय सुचवणे हे अंतर्भूत होते.
त्यांच्या सल्ल्यानुसार अनेक उपाय अमलात आणले गेले . यामध्ये सिमेंट ग्राऊटिंग (खडकांमधील तडे भरून बळकटीकरण), रॉक अँकरिंग (विशिष्ट कोनांतून खडकांमध्ये अँकर घालून स्थैर्य मिळवणे) आणि इतर विविध अभियांत्रिकी उपायांचा समावेश आहे. या पुलाचे अंदाजित आयुष्य १२० वर्षांपेक्षा अधिक आहे, ही गोष्ट देखील त्यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनामुळे शय झाली.
भारतात विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांनी मोठं योगदान दिलं आहे, हे सिद्ध करणार्‍या व्यक्तींमध्ये माधवी लता यांचे नाव कायम अजरामर राहील, हे खरे नाही काय?

Check Also

ऊर्जादायी यशोगाथा

विल्यम कमक्वांबा यांचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी आफ्रिकेतील मलावी देशाच्या कसुलु नावाच्या एका खेड्यात …